शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘नामको’ निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:10 IST

उत्तर महाराष्टतील सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या नाशिक मर्चंट को आॅप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील मतदानासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. रविवारी (दि.२३) मतदान प्रक्रि येसाठी अडीच हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले

सातपूर : उत्तर महाराष्टतील सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या नाशिक मर्चंट को आॅप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील मतदानासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. रविवारी (दि.२३) मतदान प्रक्रि येसाठी अडीच हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, या कर्मचाºयांनी शनिवारीच नेमून दिलेल्या मतदान केंद्राचा ताबा घेतला आहे. मतदानासाठी एकूण ३१० बूथची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकाºयांनी दिली.  नाशिक मर्चंट को आॅप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्रगती, सहकार आणि नम्रता असे तीन पॅनल तयार झाले असून, २१ जागांसाठी ८२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तिन्ही पॅनलच्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत आपल्याच पॅनलला मतदान करण्याचे आवाहन करीत शनिवारी प्रचार थांबविला आहे. मल्टी शेड्यूल बँक असल्याने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आणि परराज्यातही बँकेच्या शाखा असून, मतदारही विखुरलेले आहेत. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागली.अखेरच्या क्षणापर्यंत प्रचारतीन्ही पॅनलने जाहिर प्रचार समाप्त केला असला तरी अखेरच्या क्षणापर्यंत मतदारापर्यंत पोहचण्याची धडपड सुरू असून दिवसभर सभासदांना कॉल सेंटर तसेच उमेदवारांनी मोबाईल वर दूरध्वनी करून मतदानाचे स्मरण करून दिले जात होते. सोशल मिडीयावरूनही जोरदार प्रचार सुरू होता. परीचीतांकडून तसेच विविध ज्ञातींच्या नेत्यांकडून देखील यंदा उमेदवारांचा प्रचार सुरू असल्याचे दिसून आले.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रElectionनिवडणूक