शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्तांचा तक्रारींचा पाढा

By admin | Updated: December 9, 2015 23:31 IST

मेळावा : विविध समस्यांवर झाली चर्चा

नाशिक : जिल्हा कोषागार कार्यालयाने आयोजित केलेल्या सेवानिवृत्तांच्या मेळाव्यातपेन्शन मिळण्यास येणाऱ्या अडचणी, बॅँकांमध्ये लावाव्या लागणाऱ्या रांगा, तेथे मिळणारी वागणूक अशा विविध तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. सेवानिवृत्तांना व्यवहार करण्यासाठी एटीएम देण्याची केली जाणारी मागणी मात्र फेटाळून लावण्यात आली. कोषागार खात्याचे विभागीय सहसंचालक बाळासाहेब घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात प्रामुख्याने सेवानिवृत्तांनी दरमहिन्याला बॅँकेत जाऊन पैसे काढण्याऐवजी त्यांना एटीएम दिल्यास मोठा त्रास कमी होणार असल्याचे सांगून मागणी केली. बॅँकांमध्ये सेवानिवृत्तांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसते, वृद्ध सेवानिवृत्तांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. या साऱ्या गोष्टींची दखल घेऊन बॅँकांनी किमान सेवानिवृत्तांसाठी तरी स्वतंत्र खिडकी उघडावी आदि मागण्या करण्यात आल्या. राज्याच्या वित्त विभागानेच सेवानिवृत्तांना एटीएम न देण्याचा निर्णय घेतल्याची बाब पटवून देण्यात आली, त्यामागे सेवानिवृत्तांचाच लाभ असल्याचेही अधिकाऱ्यांनी पटवून दिले. काही सेवानिवृत्तांना वयोमानामुळे दिसत नाही, तर काहींच्या एटीएमचा दुरुपयोग होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगण्यात आले. या मेळाव्यास सहकोषागार अधिकारी संतोष जाधव, सहायक लेखानिधकारी मानसी पाटील, स्टेट बॅँकेचे लक्ष्मण गायकवाड, सेवानिवृत्त संघटनेचे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, माधवराव भणगे, अनिता अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येने सेवानिवृत्त सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)