नाशिक : नाशिकरोड कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप नाशिक बार असोसिएशनने केला असून त्रस्त वकील व पक्षकांरानी लेखी स्वरूपात आपल्या तक्रारी कळविण्याचे आवाहन बारचे अध्यक्ष अॅड़ नितीन ठाकरे यांनी केले आहे़महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड़जयंत जायभावे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कौटुंबिक न्यायालयात काम करणाऱ्या वकिलांच्या बुधवारी (दि़२४) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़ या बैठकीस समन्वय समितीचे सदस्य गैरहजर राहिल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करून नवीन सदस्य नेमण्याची मागणी यावेळी उपस्थित वकिलांनी केली़कौटुंबिक न्यायालयात झालेल्या या बैठकीस बारचे उपाध्यक्ष अॅड़बाळासाहेब आडके, अॅड़ हेमंत गायकवाड, अॅड़ प्रकाश ताजनपुरे, अॅड़ सुरेश निफाडे, अॅड़ साहेबराव बोराडे, अॅड़ अरुण माळोदे यांच्यासह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
न्यायाधीशांविरोधात वकिलांची तक्रार
By admin | Updated: June 25, 2015 00:38 IST