शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमएस’प्रणालीच्या तक्रारींची आता आॅनलाइन दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 00:42 IST

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत सर्व बांधकाम विषयक विकास योजनांसाठी ‘पी.एम.एस.’ प्रणालीचा वापर करण्यास शासनाने बंधनकारक केले असून, सदर प्रणालीची अंमलबजावणी तसेच ई-निविदा विषयक तक्रारीचे निराकरण करून, जलदगतीने काम व्हावे यासाठी सर्व नोंदणीकृत ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंते व मजूर सहकारी संस्था या प्रवर्गातील ठेकेदारांसाठी गुगल फॉर्मवर आधारित तक्रार प्रणाली सुरू करण्यात आली असून, या प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.

नाशिक : नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत सर्व बांधकाम विषयक विकास योजनांसाठी ‘पी.एम.एस.’ प्रणालीचा वापर करण्यास शासनाने बंधनकारक केले असून, सदर प्रणालीची अंमलबजावणी तसेच ई-निविदा विषयक तक्रारीचे निराकरण करून, जलदगतीने काम व्हावे यासाठी सर्व नोंदणीकृत ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंते व मजूर सहकारी संस्था या प्रवर्गातील ठेकेदारांसाठी गुगल फॉर्मवर आधारित तक्रार प्रणाली सुरू करण्यात आली असून, या प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.सदर तक्रार प्रणाली नोंदणीकृत ठेकेदारांसाठी असून, सदर तक्रारीत कामाचे नाव, ठेकेदाराचे नाव, ई-मेल व मोबाइल क्रमांक नोंदविणे तसेच पी.एम. एस.(प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम) अथवा ई-निविदा विषयक कामाच्या बाबतीत पीएमएस क्रमांक अथवा ई-निविदा क्रमांक टेंडर आयडी नोंदविणे आवश्यक राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.सदर तक्रार प्रणाली आॅनलाइन असल्याने ज्या विभागांशी संबंधित सदर तक्रार असेल त्यांनाही तक्रार ई-मेल द्वारे प्राप्त झाल्यानंतर सदर तक्रारीचे निवारण करून त्याबाबत केलेल्या कार्यवाहीचे उत्तर ई-मेलद्वारे संबंधित तक्रारदारास तक्रार करण्यास तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ई-मेल द्वारे सात दिवसांत कळविणे आवश्यक करण्यात आले आहे. संबंधित सर्व विभागांमधील संगणक प्रणाली अवगत असलेल्या एक कनिष्ठ सहायक, वरिष्ठ सहायक, सहायक लेखाधिकारी यांना सदर तक्रार निवारण प्रणालीचे अनुपालन करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदonlineऑनलाइन