शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

कपालेश्वर ट्रस्ट कार्यालय तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

By admin | Updated: May 22, 2016 22:34 IST

कपालेश्वर ट्रस्ट कार्यालय तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

 पंचवटी : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई श्री कपालेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी आल्या असता देसाई यांनी मंदिरात प्रवेश करू नये यासाठी विरोध दर्शविण्यासाठी जमलेल्या जमावातील सात ते आठ संशयितांनी ट्रस्टच्या कार्यालयात अनधिकृतपणे प्रवेश करून कार्यालयातील सीसीटीव्ही, संगणक, कॅमेरा व टेबल खुर्च्यांची मोडतोड करून विश्वस्तांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांत सात ते आठ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री कपालेश्वर ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. भाऊसाहेब गंभीरे यांनी याबाबत पंचवटी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गुरुवारी दुपारी देसाई या कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. त्या ट्रस्टच्या कार्यालयात विश्वस्तांबरोबर चर्चा करत असताना जमावाने आरडाओरड करून त्यांना मंदिरात जाण्यासाठी विरोध केला, त्यानंतर सायंकाळच्या सुमारास देसाई ह्या ट्रस्टच्या कार्यालयातून बाहेर पडताच सात ते आठ संशयितांनी ट्रस्टच्या कार्यालयात प्रवेश करून आतील कॅमेरा, टेबल, खुर्च्यांची मोडतोड करून कागदपत्रे असलेली फाईल पळविली तसेच कार्यालयात असलेले ट्रस्टी गंभीरे व प्रमोद देसाई या दोघांना धक्काबुक्की करून मारहाण करत शिवीगाळ केली होती. याबाबत गंभीरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री उशिरा पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय कार्यालयात धुडघूस माजविणाऱ्या संशयितांची नावे पोलिसांना मिळाली असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करणार आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी सांगितले. (वार्ताहर)