शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘डाटा एंट्री’च्या पैशांबाबत पुरवठामंत्र्यांकडे तक्रार पुरवठा खाते : पैसे मागणीच्या तक्रारीची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:39 IST

शिधापत्रिकाधारकांचे आधारकार्ड पुरवठा खात्याच्या सॉफ्टवेअरशी जोडण्याचे काम करणाºया ठेकेदाराला अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने निधी उपलब्ध करून दिलेला असतानाही स्थानिक पुरवठा खात्याच्या अधिकारी, कर्मचारी रेशन दुकानदारांकडून पैसे गोळा करीत असल्याची बाब ध्वनिचित्रफितीने व्हायरल झाल्याने या संदर्भात पुरवठामंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देठेकेदाराने सदोष कामे केल्याच्या तक्रारी सतरा लाख रुपयांची तरतूद

नाशिक : शिधापत्रिकाधारकांचे आधारकार्ड पुरवठा खात्याच्या सॉफ्टवेअरशी जोडण्याचे काम करणाºया ठेकेदाराला अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने निधी उपलब्ध करून दिलेला असतानाही स्थानिक पुरवठा खात्याच्या अधिकारी, कर्मचारी रेशन दुकानदारांकडून पैसे गोळा करीत असल्याची बाब ध्वनिचित्रफितीने व्हायरल झाल्याने या संदर्भात पुरवठामंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. दुसरीकडे काम न करताच, ठेकेदाराला चौदा लाख रुपये अदा करण्याची जिल्हा पुरवठा खात्याची भूमिकाही संशयाच्या फेºयात सापडली आहे.गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचे आधारक्रमांक पुरवठा खात्याच्या सॉफ्टवेअरशी जोडण्याचे काम ठेकेदारांकरवी केले जात असून, शासन त्याचे पैसे अदा करणार असतानाही आजपावेतो दोन ते तीन वेळा रेशन दुकानदारांकडूनच पुरवठा खात्याच्या अधिकारी, कर्मचाºयांनी याकामाचे पैसे गोळा केले आहेत. दुकानदारांनी पैसे देऊनही ठेकेदाराने सदोष कामे केल्याच्या तक्रारी आहेत. आधारक्रमांक चुकीचा टाकणे, पुरेसे नंबर न टाकणे, कोणाचा आधार दुसºयालाच जोडणे अशा अनेक प्रकारामुळे शिधापत्रिकाधारकांनीआधारक्रमांक रेशन दुकानदाराला देऊनही त्यांना धान्य मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे ठेकेदाराने काम न करताच तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी त्याला चौदा लाख रुपयांचे देयक अदा केले आहे. म्हणजे एकाच कामासाठी ठेकेदाराला दोन वेळा पैसे अदा करण्यात आल्यामुळे या साºया प्रकरणात काही तरी काळबेरे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आता पुन्हा ठेकेदाराकरवी सदरचे काम केले जात असून, त्यासाठी सतरा लाख रुपयांची तरतूद असल्याचे सांगितले जात असताना शहर धान्य वितरण कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक शेख हे दुकानदारांकडून पैशांची मागणी करीत असल्याची ध्वनीचित्रफित फेसबुकवर व्हायरल झाल्याने या संदर्भात शंका घेण्यास अधिक वाव निर्माण झाला आहे. मुळात आधारक्रमांक जोडण्यासाठी पुरवठा खात्याकडून रेशन दुकानदारांकडे पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार यापूर्वीच अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, सचिव महेश पाठक यांच्याकडे करण्यात आली, त्यांच्याकरवी चौकशीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, परंतु पुढे काहीच झाले नाही.