निलंबनानंतर भ्रष्टाचाराबाबत तक्रार का?
गजेंद्र पाटील हे धुळे प्रादेशिक परिवहन विभागात कार्यरत असताना त्यांनी तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली? होती. या तक्रारीनंतर त्या आरटीओला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पाटील हे सध्या नाशिक प्रादेशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक म्हणून रुजू झाले असले तरीदेखील त्यांनी आपल्या निलंबनाच्या कारवाईनंतर आरटीओमधील भ्रष्टाचाराबाबत तक्रार का केली? अशी चर्चाही नाशिकच्या आरटीओ कार्यालयात सुरू झाली आहे.
---इन्फो--
बदल्यांबाबत गटबाजी, जातीयवादाचा आरोप
अनिल परब यांनी मोटार वाहन विभागाच्या सूत्रे हाती घेत परिवहन मंत्रिपद सांभाळल्यानंतर दोन वेळा निलंबनाला सामोरे गेलेले वर्धा येथील तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची आर्थिक देवाण-घेवाणीसाठी नेमणूक केल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी तक्रारीत केला आहे. २०२० सालच्या सर्वसाधारण बदल्यांच्या कार्यपद्धतीतसुद्धा खरमाटे यांनी गटबाजी, जातीयवाद करत वाहन निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची पिळवणूक करून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, काही अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर व अन्यायकारक बदल्याही त्यावेळी करण्यात आल्या.