सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तसेच काही भागात दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहेे. सफाई कर्मचारी नियमित येत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मनपाच्या ताब्यातील मोकळे भूखंड उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले असून तेथे त्वरित स्वच्छता करावी. यासह विविध समस्यांचे निवेदन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने विभागीय अधिकारी डॉक्टर मोहन पाटील यांना देण्यात आले. याप्रसंगी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष संतोष आडांगळे, जयश्री पाटील, प्रतीक आडांगळे, हर्षल लांडगे, ज्योती जोशी, चारुशीला वानोळे, कविता जगताप आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
सिडको प्रभाग क्रमांक २९ मधील विविध समस्यांचे निवेदन विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांना देताना संतोष आडांगळे, जयश्री पाटील आदी.