नाशिक : पालिकेच्या प्रभाग क्रमांक ५२ मध्ये नागरिकांना नागरी समस्या आता आॅनलाइन करता येतील. यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी सकाळी या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले. यावेळी महापौर अॅड. यतिन वाघ, प्रभाग क्रमांक ५२ चे नगरसेवक सुदाम कोंबडे, डॉ. प्रदीप पवार, शर्वरी लथ, अशोक सातभाई यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रभागातील मंजूर कामे, प्रस्तावित कामे अशा सर्व कामांची माहिती त्यावर उपलब्ध आहे. शिवाय महापालिकेचे विविध फॉर्म्स उपलब्ध आहेत. तसेच तक्रारही करता येणार आहे.दरम्यान, राज ठाकरे यांनी आज गोदापार्कच्या कामांची पाहणी केली. सकाळी सातपूर येथील विश्वासनगर येथे शाळा इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी आसारामबापू आश्रम येथे पाहणी केली. (प्रतिनिधी)