शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यमंत्र्यांपुढे वाचला तक्रारींचा पाढा

By admin | Updated: June 27, 2017 01:09 IST

सुरगाणा : राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सोमवारी ग्रामीण रूग्णालय आरोग्य केंद्राच्या पाहणी दौऱ्यात नागरिकांनी आरोग्यसेवेबाबत तक्रारींची पाढाच वाचला.

लोकमत न्यूज नेटवर्कसुरगाणा : राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सोमवारी केलेल्या ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाहणी दौऱ्यात सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी आरोग्यसेवेबाबत तक्रारींची पाढाच वाचला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मोहनराव गांगुर्डे, आमदार जे. पी. गावित, सभापती सुवर्णा गांगोडे यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. तालुका दौऱ्यावर आलेले आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी प्रथम बुबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. यावेळी तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे व नागरिकांनी येथील आरोग्यसेवेचा बोजवारा उडून कसे रामभरोसे चालले आहे याबाबत तक्र ारींचा पाढाच कथन केला. बुबळी येथील वैद्यकीय अधिकाऱ्याला मनखेड येथे प्रतिनियुक्तीवर पाठवले, तर दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला कोणताही विचार न करता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी एक महिन्याची रजा मंजूर केली. याठिकाणी प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. बुबळी प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे चालले असल्याची तक्र ार झाल्याने आरोग्यमंत्री सावंत यांनी संबंधित वरिष्ठांपासून सर्वांनाच धारेवर धरले. पुढच्यावेळी परत येईन तेव्हा एकही तक्र ार यायला नको अशी तंबी दिली. बोरगाव येथेही दोन पदे मंजूर असताना गेल्या दीड वर्षापासून एकच वैद्यकीय अधिकारी आहे. त्यांनाही पाच दिवसांची रजा मंजूर करून सोडून दिले. बोरगाव आरोग्य केंद्र हे महामार्गावर असल्याने अपघातातील जखमींवर उपचार करण्यास अडचणी येतात. त्यामुळे येथे १०८ अ‍ॅम्बुलन्स देण्यात येऊन कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारींची नेमणूक करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.  सुरगाणा ग्रामीण रुग्णालयाची मात्र उशीर झाल्याने धावती पाहणी झाली. यावेळी आमदार जे. पी. गावित, सभापती सुवर्णा गांगोडे, नगराध्यक्ष सचिन आहेर, नगरसेवक भरत वाघमारे, भाजपाचे जि. प. सदस्य एन. डी. गावित, नगरसेवक सुरेश गवळी आदींनीही सुरगाणा ग्रामीण रूग्णालयाच्या समस्यांबाबत तक्रारी केल्या. येथे स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, एक्स-रे यासह या ग्रामीण रूग्णालयासह तालुक्यातील सर्व रिक्त पदे भरण्यात येऊन सुरगाणा येथे लवकरात लवकर सुविधा संपन्न उपजिल्हा रूग्णालय देवून होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी केली.