शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या कांदा निर्यात बंदीच्या धरसोडीबाबत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:11 IST

जागतिक व्यापार संघटनेच्या कृषी समितीची बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांनी कांदा प्रश्नी आवाज उठविला. भारताने कांदा निर्यात ...

जागतिक व्यापार संघटनेच्या कृषी समितीची बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांनी कांदा प्रश्नी आवाज उठविला. भारताने कांदा निर्यात बंदी का केली, याबाबत विचारणा केल्यानंतर भारताकडून समाधानकारक उत्तर आले नाही. हा तात्पुरता निर्णय असल्याचे स्पष्टीकरण भारताकडून देण्यात आल्याचे दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत सांगितले. जागतिक व्यापार संघटनेच्या कृषी विषयक करारातील कलम १२ नुसार निर्यात बंदी करताना आयात करणाऱ्या देशांना पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे. असे असतानाही भारताने कुठलीही पूर्वसूचना न देता किंवा विशिष्ट कोटा न ठरवता थेट निर्यातबंदी केली. याबाबत भारताला विचारणा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

बांगलादेश आणि नेपाळ हे दोन्ही देश भारतीय कांद्यावर पूर्णपणे अवलंबून असताना भारताकडून अचानक झालेल्या निर्यातबंदीमुळे या देशांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. २०१९ मध्ये कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय व्यापार संबंधही बिघडले होते. त्या वेळी दिल्ली येथे झालेल्या व्यापार मंचच्या बैठकीत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आवाज उठविला होता. जर भारताने पूर्वसूचना दिली असती तर आम्हाला इतर देशांमधून कांदा मागविता आला असता. पण तसे न करता अचानक बंदी घातल्याने आम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला, असे त्या वेळी त्यांनी बैठकीत सांगितले होते.

कोट -

जगात दुसऱ्या क्रमांकाचा कांदा उत्पादन असलेल्या भारताने आजपर्यंत कांद्याच्या निर्यातीचे ठोस धोरण न ठरविल्याने कांदा उत्पादकांना आर्थिक फटका बसत आलेला आहे. जगात भारताची ओळख बेभरवशाचा कांदा निर्यातदार अशी निर्माण झाली असून, आता जागतिक व्यापार संघटनेनेही भारताच्या कांदा निर्यातबंदीच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे. आता तरी कांद्याचे राष्ट्रीय धोरण तयार व्हावे, ही अपेक्षा आहे.

- भारत दिघोळे,

संस्थापक अध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना