शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वोक्हार्ट हॉस्पिटलविरुद्ध जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

By admin | Updated: May 20, 2014 01:11 IST

नाशिक : वोक्हार्ट हॉस्पिटलच्या वागणुकीबाबत जिल्ह्यातील सर्व कर्मचारी संघटनांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन.

नाशिक : राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर सोनारीकर यांच्यावर उपचार करणार्‍या व नंतर त्यांना मयत म्हणून घोषित करणार्‍या वोक्हार्ट हॉस्पिटलच्या वागणुकीबाबत जिल्ह्यातील सर्व कर्मचारी संघटनांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ११ एप्रिलपासून सोनारीकर हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वेळोवेळी हॉस्पिटलकडून सांगण्यात आले. मात्र १७ मे रोजी सकाळी दहा वाजता पेशंट दगावला आहे, त्याला घरी घेऊन जा व बिलाची रक्कम भरा, असे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले. त्यानुसार सोनारीकर यांचे नातेवाईक, कुटुंबीय व संबंधितांनी सायंकाळी सात वाजता अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. हॉस्पिटलने उपचार काळात जवळपास नऊ लाख ८० हजार इतके बिल काढले होते. त्यातील पाच लाख ६० हजार रुपये भरण्यात आले व सुमारे दोन लाखाचा मेडिक्लेम होता; परंतु हॉस्पिटलने अडीच लाख रुपये भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही, असे सांगितले. त्यावर पावणेदोन लाख रुपये भरण्यात आले व मृतदेह ताब्यात मागितला असता, हॉस्पिटलने ‘पेशंट अजून जिवंत आहे, आम्ही मृत्यूचा दाखला देऊ शकत नाही. पेशंटचा मृत्यू कधी होईल हे आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही त्यांना घेऊन जा व तुमच्या फॅमिली डॉक्टरकडून मृत घोषित करून दाखला घ्या’ असा सल्ला दिला. त्यावर हॉस्पिटलशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सव्वासहा वाजता सोनारीकर यांचे व्हेंटिलेटर काढले व त्यांना स्ट्रेचरवर व्हरांड्यात आणून ठेवले. त्यानंतर जवळपास अर्ध्या तासाने त्यांची प्राणज्योत मालवली. उपरोक्त घटनाक्रम पाहता हॉस्पिटल प्रशासनाने निर्दयीपणे वागणूक दिली व बिलाची रक्कम मिळेपर्यंत सोनारीकर यांच्या मृत्यूचा बनाव उभा केला आहे. हे पाहता हॉस्पिटलची चौकशी करावी, राज्य सरकारचे हजारो कर्मचारी या हॉस्पिटलशी जोडले गेले असल्याने तो संबंध रद्द करावा, सोनारीकर यांच्या कुटुंबीयांकडून वसूल केलेली जादाची रक्कम परत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)