शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वैयक्तिक रेडीमेड शौचालयाचे अनुदान मिळत नसल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:12 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात येणाºया वैयक्तिक रेडीमेड शौचालयाचे अनुदान लाभार्थींना मिळाले नसल्याची तक्रार के. पा. नगर येथील प्रकाश सूर्यभान कातकाडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिन्नर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात येणाºया वैयक्तिक रेडीमेड शौचालयाचे अनुदान लाभार्थींना मिळाले नसल्याची तक्रार के. पा. नगर येथील प्रकाश सूर्यभान कातकाडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-ºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.  स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपण शौचालयाची कामे केली असून, कामांचे पैसे असताना लाभार्थींना धनादेश दिले जात नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रेडीमेड शौचालयास मान्यता नसतानाही दुसºया ठेकेदाराकडून कामे करून घेतली जात आहेत.सदर शौचालय हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार ग्रामसेवक व सरपंच यांना माहिती असून, सदर कामाची चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, काही ग्रामस्थांनीही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे शौचालयाचे अनुदान मिळत नसल्याची तक्रार केली आहे. गावातील लाभार्थींच्या नावे पंचायत समितीकडून शौचालय बांधकाम अनुदान ग्रामपंचायतीकडे जमा झाले आहेत; मात्र सरपंच नारायण बोडके व ग्रामसेवक प्रत्येक लाभार्थीकडे पैशांची मागणी करून अनुदानाचे धनादेश द्यायला टाळाटाळ करीत असल्याचे म्हटले आहे. बांधलेल्या शौचालयाचा वापर दोन महिन्यांपासून सुरू असताना सरपंच मात्र अनुदानाच्या धनादेशावर स्वाक्षºया करत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.कोणत्याही लाभार्थीकडे पैशांची मागणी केली नाही. थकबाकी वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्याने मासिक बैठकीत ठराव करण्यात आला आहे. त्यानुसार थकीत घरपट्टी व पाणीपट्टी भरल्याखेरीजकुणालाही दाखले व शासकीय लाभ द्यायचा नाही हे बैठकीतच सर्वानुमते ठरले आहे. ग्रामपंचायतीचा वसुली द्या आणि शौचालय बांधणीचे अनुदान घ्या असा विषय आहे. अन्य कुणाही ठेकेदाराला काम करायला सांगितले नाही. आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून, चुकीचे आहेत.  - नारायण बोडके, सरपंच, के. पा. नगर