सप्तशृंगगड : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर नाशिक ग्रामीण पोलीससाठी प्रथमच कळवण पोलीस उपविभागातर्फेसाडेपाचशे पायऱ्या चढणे व उतरणे अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध वयोगटांतील पोलीस स्त्री, पुरुष कर्मचाऱ्यानी तसेच गडावरील ग्रामस्थ पोलीस मित्र यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला.शनिवारी सकाळी अकरा वाजता या स्पर्धेला सुरु वात झाली. कळवण पोलीस उपविभागीय अधिकारी देवीदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्र म घेण्यात आला. पोलीस कर्मचाऱ्यांसह गडावरील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात भाग घेऊन आनंदी वातावरणात ही स्पर्धा पार पडली. ग्रामीण भागातील पोलीस कर्मचाऱ्यांनी स्पर्धेबरोबर देवी दर्शनाचाही लाभ घेतला. साडेचपाचशे पायऱ्या चढण्याची व उतरण्याची स्पर्धा होती.भक्तांगण हॉल येथे बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देण्यात आले. देवी संस्थानामधील भक्तांगण या इमारतीमध्ये कार्यक्र म पार पडला. पोलीस उपविभागीय अधिकारी देवीदास पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, चैत्रोत्सवापूर्वी अशाच स्पर्धा घेऊन कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्यास एक प्रकारे मदतच होईल.याप्रसंगी कळवण पोलीस उपविभागीय अधिकारी देवीदास पाटील, कळवण पोलीस निरीक्षक सुजय घाटगे, दिंडोरी पोलीस निरीक्षक मधुकर गावित, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, देवी संस्थानचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्कअधिकारी भिकन वाबळे, कार्यालय प्रमुख दिलीप पवार, प्रकाश जोशी, सरपंच सुमनबाई सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी, कळवण पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर गावित, पोलीस कॉन्स्टेबल नीलेश साळी, साहेबराव शिरोळे, कांतीलाल व्यापारे, बबन पाटोळे आदि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)
गडावरील पायऱ्या चढण्याची स्पर्धा
By admin | Updated: September 25, 2016 23:41 IST