शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

तीन वर्षांच्या तुलनेत ध्वनी, वायुप्रदुषणात लक्षणीय घट!

By admin | Updated: November 4, 2016 10:40 IST

आरोग्यासह पर्यावरणास घातक असलेल्या फटाक्यांपासून दूर होत नाशिककरांनी यावर्षी ध्वनी व वायू प्रदूषण कमी करण्याबाबत चांगलीच मदत केली.

दिवाळीत नागरिक झाले पर्यावरणस्नेही; वायुप्रदूषण कमी

 

विजय मोरे, ऑनलाइन लोकमत                                                                                                                           नाशिक, दि. ४ -  आरोग्यासह पर्यावरणास घातक असलेल्या फटाक्यांपासून दूर होत नाशिककरांनी यावर्षी ध्वनी व वायू प्रदूषण कमी करण्याबाबत चांगलीच मदत केल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे़ विशेष म्हणजे गत तीन वर्षांत ध्वनीमध्ये सुमारे ८ डेसीबलपर्यंत घट तर वायुप्रदूषणही कमी झाले आहे़ लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीज असे तीन्ही दिवस मोठ्या प्रमाणात फटाके वाजविले जात असल्यामुळे ध्वनी व वायुप्रदूषणात मोठी वाढ होते़ यामुळे मानवासह, पशू-पक्षी तसेच पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो़ हा परिणाम रोखण्यासाठी प्रसार माध्यमे, सामाजिक संस्था यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते़ यामुळे नागरिकांच्या मानसिकतेतील बदल हा पर्यावरणासाठी अनुकूल ठरतो आहे़ महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून दिवाळीच्या कालावधीत ध्वनी व हवेतील घातक वायुंची तपासणी केली जाते़ यंदा ३० आॅक्टोबर अर्थात लक्ष्मीपूजन ते १ नोव्हेंबर (पाडवा) या तीन दिवसांमध्ये केलेल्या ध्वनीचाचणीत सीबीएस व बिटको पॉईट परिसरात सर्वाधिक ध्वनीप्रदूषण तर त्या खालोखाल पंचवटी, दहिपूल व सिडको परिसराचा समावेश आहे़ मात्र असे असले तरी ध्वनी प्रदूषणाची गत तीन वर्षांतील पातळी पाहता या पाचही परिसरांमध्ये दरवर्षी घट होत चालली आहे़ शहरात लक्ष्मीपूजनच्या दिवशी करण्यात आलेल्या वायुप्रदूषण मोजणीमध्ये नायट्रोजन डायआॅक्साईडचे प्रमाण हे सर्वाधिक अर्थात सरासरी ७२ मायक्रो ग्रॅम पर क्युबिक मीटर आढळून आले़ पाडव्याच्या दिवशी हवेमध्ये कार्बन मोनाक्साईडचे प्रमाण हे सर्वाधिक अर्थात सरासरी ७१ मायक्रो ग्रॅम पर क्युबिक मीटर तर भाऊबीजेच्या दिवशी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये ओ ३ (ओझोन) ची आकडेवारी सरासरी ८५ पर्यंत पोहोचल्याचे आढळून आले़ महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार ५१ ते १०० टक्क्यापर्यंतचे प्रदूषण हे तीव्र स्वरूपाचे नसले तरी त्याचा लहान मुले व श्वसनविकार असणाऱ्यांवर घातक परियाम होत असतो़ एकंरीतच नाशिककरांनी यंदाची दिवाळी पर्यावरणपुरक पद्धतीने साजरी केल्यामुळे ध्वनी व वायूप्रदूषणात घट झाल्याचे चित्र आहे़हवेत नायट्रोजन व कार्बनचे प्रमाण अधिकमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या केटीएचएम महाविद्यालय केंद्रातर्फे दिवाळीच्या तीन दिवसांमधील वायूप्रदूषण नोंदविण्यात आले़ त्यामध्ये लक्ष्मीपूजन (दि़३०), पाडवा (दि़३१) व भाऊबीज (०१) या तीन दिवसांमध्ये प्रथम दिवशी नायट्रोजन डायआॅक्साईड (७२), कार्बन मोनॉक्साईड (७१), ओझोन (८५) अधिक असल्याचे आढळून आले आहे़ सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमे यांच्याकडून शाळा, महाविद्यालये तसेच नागरिकांमध्ये ध्वनी व वायुप्रदूषणातची जनजागृती करण्यात आली होती़ तसेच दिवसेंदिवस पर्यावरणाप्रती होणारी जनजागृतीमुळे गतवर्षीच्या दिवाळी सणाच्या तुलनेत यावर्षी ध्वनी व वायुप्रदूषणात घट झाली आहे़ महाराष्ट्र प्रदूषण व नियंत्रण मंडळांच्या संकेतस्थळावर सदर आकडेवारी प्रसिद्धही करण्यात आली आहे़- राजेंद्र पाटील, विभागीय प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, नाशिक़ 

 

लक्ष्मीपूजनच्या दिवशी झालेले(दि़३०) वायुप्रदूषण (मायक्रो ग्रॅम पर क्युबीक मीटर)

हवेतील घटककमीत कमी जास्तीत जास्त सरासरी

 

पीएम १० (धुलीकण) १७ ४६ ३१एसओ-२ (सल्फर) ०१ ८४ १३एनओ-२ (नायट्रोजन) ४० १५१ ७२पीएम २़५ (धुलीकण) १८ ९६ ४०सीओ (कार्बन मोना) १६ ११५ ५८ओ-३ (ओझोन) ०३ १६२ ६०पाडव्याच्या दिवशीचे(दि़३१) वायुप्रदूषण (मायक्रो ग्रॅम पर क्युबीक मीटर)                                                                                                                                                                          हवेतील घटककमीत कमी जास्तीत जास्त सरासरीपीएम १० (धुलीकण) १९ ४४ ३२एसओ-२ (सल्फर) ०२ २९ १२एनओ-२ (नायट्रोजन) ०८ १४६ ६५पीएम २़५ (धुलीकण) १८ ११५ ४९सीओ (कार्बन मोना) २२ १२० ७१ओ-३ (ओझोन) ०५ १३६ ५९

 

भाऊबीजेच्या दिवशीचे(दि़०१) वायुप्रदूषण (मायक्रो ग्रॅम पर क्युबीक मीटर)हवेतील घटककमीत कमी जास्तीत जास्त सरासरीपीएम १० (धुलीकण) १९ ४३ ३०एसओ-२ (सल्फर) ०१ २३ ०७एनओ-२ (नायट्रोजन) ३७ १५५ ७२पीएम २़५ (धुलीकण) १९ ८० ४३सीओ (कार्बन मोना) १५ ९४ ४९ओ-३ (ओझोन) ०२ १७४ ८५लक्ष्मीपूजन (दि़३०) ध्वनी प्रदूषणाची पातळी (आकडेवारी डेसीबलमध्ये)

 

परिसर २०१४ २०१५२०१६ १) सीबीएस२३ आॅक्टो़११ नोव्हे़३० आॅक्टो़दिवसा८५.५ ८१़९७७़४रात्री ८२.२ ८१़७७४़७

 

२) पंचवटीदिवसा८१.५ ७८़५७०़५रात्री ७०.० ७५़२७०़६

 

३) दहिपूलदिवसा८२.६ ७९़५७०़२रात्री ७७.८ ७४़९६७़८

 

४) सिडको दिवसा७६.३ ७२़८७२़४रात्री ६०.४ ५८़१५९़९

 

५) बिटको पॉर्इंट दिवसा८३.९ ७९़६७३़८रात्री ७५.२ ७९़०७२़०