शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीच्या तालावर नाचण्यास नकार

By admin | Updated: September 30, 2015 23:49 IST

मुकणे पाणी योजना : योग्य वेळी निर्णय घेण्याची मनसेची भूमिका

नाशिक : मुकणे पाणीपुरवठा योजनेबाबत एल अ‍ॅण्ड टी कंपनीने ३० सप्टेंबरपर्यंत दिलेली मुदत बुधवारी (दि.३०) संपुष्टात आली. मात्र, कंपनीने अल्टीमेटम देऊनही कंपनीच्या तालावर नाचण्यास सत्ताधारी मनसेने नकार दिला असून, मुकणेप्रश्नी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचे महापौर अशोक मुर्तडक यांनी स्पष्ट केले आहे. मुकणे धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा राबविण्याच्या योजनेसंदर्भात निविदाप्रक्रियेला राज्य शासनाने दिलेली स्थगिती उठविल्यानंतर सदर प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला. राज्य शासनाने स्थगिती उठविताना महापालिकेला कोणतीही आर्थिक झळ लागणार नाही आणि खातरजमा करूनच निर्णय घेण्याचे महापालिकेला सूचित केले होते. दरम्यान, निविदाधारक एल अ‍ॅण्ड टी कंपनीने आयुक्तांना पत्र पाठवून ३० सप्टेंबरपर्यंतच मुदत असल्याने आणि नंतर पुढे मुदतवाढ देणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे स्पष्ट केले. सदर पत्र आयुक्तांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिले आणि लवकरात लवकर निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रत्यक्ष निविदाधारक कंपनीनेच अल्टीमेटम दिल्याने महापौर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून होते. महापौरांनीही याबाबत विशेष महासभा बोलवून सर्वसंमतीने निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु ३० सप्टेंबरची मुदत संपूनही महासभा न झाल्याने मुकणे पाणी योजनेच्या भवितव्याबाबत चर्चा केली जात असतानाच महापौरांनी सदर कंपनीच्या तालावर नाचण्यास नकार दिला आहे. महापालिका नियमानुसारच कामकाज करेल. कोणताही निर्णय घाईघाईने घेतला जाणार नाही. सर्वसंमतीनेच निर्णय घेतला जाईल, असे महापौर अशोक मुर्तडक यांनी स्पष्ट केले.