शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

नगरपंचायतींमध्ये संमिश्र कौल

By admin | Updated: November 2, 2015 23:52 IST

सर्वाधिक जागा : चांदवड, सुरगाण्यात भाजपा, कळवणमध्ये राष्ट्रवादी, पेठमध्ये सेना, देवळ्यात आघाडी, निफाडमध्ये सेना-भाजपा समसमान

नाशिक : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत पहिल्यांदाच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी कोेणत्याच राजकीय पक्षाच्या पारड्यात पूर्ण बहुमताचे दान न टाकता संमिश्र कौल दिला आहे. चांदवड, देवळा, कळवण, पेठ, सुरगाणा व निफाड या सहा तालुक्यांमध्ये प्रत्येकी १७ जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले.सोमवारी झालेल्या मतमोजणीत चांदवडमध्ये भाजपाला ५, देवळ्यात विकास आघाडीला ८, पेठमध्ये शिवसेनेला ८, सुरगाण्यात भाजपाला ७, कळवणमध्ये राष्ट्रवादीला ७, निफाडमध्ये शिवसेना-भाजपाला प्रत्येकी ५ जागा मिळाल्याने हे सर्वाधिक जागा मिळविणारे पक्ष ठरले आहेत. जिल्ह्यात एकूण १०२ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत प्रत्येकी २२ जागा जिंकून शिवसेना व भाजपा हे दोन पक्ष सर्वाधिक जागा मिळविणारे ठरले आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादीने १५, अपक्षांनी १४, कॉँग्रेसने ८, माकपाने ७, अन्य २ (देवळ्यातील जनसेवा पॅनल) तर बसपानेही निफाडमध्ये १ जागा पटकावून खाते खोलले आहे. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीत पुन्हा घोडेबाजाराला उधाण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.देवळ्यात विकास आघाडीचे वर्चस्वदेवळा : येथील नगरपंचायत निवडणुकीत देवळा विकास आघाडीने १७ पैकी आठ जागा जिंकून नगरपंचायतीवर वर्चस्व प्राप्त केले असून, जनशक्ती पॅनलला पाच जागांवर समाधान मानावे लागले आहेत. जनशक्ती पॅनलचे नेते जितेंद्र अहेर विजयी झाले आहेत. त्यांचे सहकारी उदयकुमार अहेर यांचा पराभव झाला आहे. तसेच डॉ. पंकज निकम, भारती अहेर, चिंतामण अहेर, अनुजा अहेर, गोविंद अहेर यांंचा पराभव झाला आहे. चार अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्र. ३ शिला अहेर यांना २७४ तर चित्रा अहेर यांना १६० मते मिळाली. शिला आहेर यांनी चित्रा अहेर यांचा १०४ मतांनी पराभव केला. प्रभाग क्र. ४ मध्ये माजी सरपंच जितेंद्र अहेर २६६ मते मिळवत विजयी झाले. रजत अहेर १०७, उमेश अहेर ४९ मते मिळवून पराभूत झाले. प्रभाग क्र. ५ मध्ये सिंधू अहेर यांनी ३१३ मते मिळवत दीप्ती अहेर (१७८) यांना १३५ मतांनी पराभूत केले. प्रभाग क्र. - ६ कॉँग्रेसच्या बेबी नवरे (२५६) यांनी संगीता गांगुर्डे (१२६) यांना १३५ मतांनी पराभूत केले. प्रभाग क्र. ९ मध्ये सुनंदा अहेर (१५८) यांनी भारती अहेर (१०९) यांचा ४९ मतांनी पराभव केला. प्रभाग क्र.-११ अशोक अहिरे (३५०) यांनी उदयकुमार अहेर (१४८) यांचा २०२ मतांनी पराभव केला. प्रभाग क्र.- १२ अतुल पवार यांनी या निवडणुकीत सर्वाधिक ४५३ मते मिळविली. त्यांनी अश्विनी अहेर (१४१) यांचा पराभव केला. प्रभाग क्र-१४ मध्ये धनश्री अहेर (३३२) यांनी अश्विनी अहेर (१७) यांचा पराभव केला. प्रभाग क्र.-१५ मध्ये लक्ष्मीकांत अहेर (१७६) यांनी साहेबराव अहेर (१०९), गोविंद अहेर (१००), सुभाष अहेर (८९) यांचा पराभव केला. प्रभाग क्र.-१६ वृशाली अहेर (१५५) यांनी वनिता शिंदे (९०), शोभा अहेर (७३), मंगला भाऊसाहेब अहेर (४८), मंगला दिलीप अहेर (४०) यांना पराभूत केले. प्रभाग क्र. १३ मध्ये वत्सला अहेर (२२१) यांनी अनुजा अहेर (१६९) यांना पराभूत केले. या प्रभागात वत्सला अहेर यांनी माघार घेतल्याची चर्चा होती. मात्र मतदारांनी निवडणुकीपासून दूर राहिलेल्या वत्सला अहेर (अपक्ष) यांना निवडून दिले.

देवळ्यातील विजयी उमेदवार व मिळालेली मते प्रभाग विजयी उमेदवार पॅनल मते १ बाळू अहेर देवळा विकास आघाडी २६९२ ललिता भामरे अपक्ष १४२३ शिला अहेर देवळा विकास आघाडी २७४४ जितेंद्र अहेर कॉँग्रेस, जनशक्ती पॅनल २६६५ सिंधू अहेर अपक्ष ३१३६ प्रदीप अहेर अपक्ष १४४७ बेबी नवरे कॉँग्रेस, जनशक्ती २५६८ रोशन अलिटकर देवळा विकास आघाडी २७५९ सुनंदा अहेर अपक्ष १५८१० मनीषा गुजरे देवळा विकास आघाडी १७७११ अशोक अहेर देवळा विकास आघाडी ३५०१२ अतुल पवार देवळा विकास आघाडी ४५३१३ वत्सला अहेर अपक्ष २२११४ धनश्री अहेर देवळा विकास आघाडी ३३२१५ लक्ष्मीकांत अहेर देवळा विकास आघाडी १७६१६ वृशाली अहेर अपक्ष ११५१७ केदा वाघ देवळा विकास आघाडी १७४

 

कळवणमध्ये राष्ट्रवादीकळवण : नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत कळवणकरांनी कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत स्पष्ट दिले नसून राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागांवर विजय मिळाला असून, भाजपाने ४ तर काँग्रेस ३, शिवसेनेला १ तर अपक्षांनी २ जागावर विजय मिळविला आहे.कळवणकरांनी नगरपंचायतीच्या सत्तेची सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात दिले असून, अपक्ष विजयी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असल्याचा दावा जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व कौतिक पगार यांनी केला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात आघाडीचा धर्म पाळला जाणार असल्याचे संकेत मिळाले आहे. या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान कळवण पंचायत समितीचे माजी सभापती कौतिक पगार यांनी मिळविला असून, पती व पत्नी नगरपंचायतमध्ये निवडून जाण्याचा मानही मिळविला आहे. सर्वाधिक कमी अवघ्या २ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयेश पगार विजयी झाले असून, या निवडणुकीत ५५ मतदारांनी नाटोचा वापर केला.निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत नीलेश जाधव यांनी निवडणुकीचे निकाल जाहीर केले. विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, कळवण पंचायत समितीचे माजी सभापती कौतिक पगार भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, काँग्रेसचे तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अतुल पगार व मयूर पगार, शिवसेनेचे शहरप्रमुख साहेबराव पगार यांनी कळवण शहरातील व प्रभागातील मतदारांच्या भेटी घेऊन आभार मानले.कळवण पंचायत समितीचे माजी सभापती कौतिक पगार, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, कळवण तालुका युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अतुल पगार, शिवसेना शहरप्रमुख साहेबराव पगार, माजी सरपंच दिलीप मोरे, बाळासाहेब जाधव, कळवणचे माजी आमदार काशीनाथ बहिरम यांचे सुपुत्र मयूर बहिरम तसेच जिल्हा परिषदेच्या सदस्य सुरेखा जगताप, कळवण बाजार समितीचे संचालक हरिश्चंद्र पगार, माजी सरपंच सुनील जैन, उद्योगपती सुनील महाजन, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार, भाजपाचे गणेश पगार, माजी सरपंच सुनील महाले यांच्या सौभाग्यवती या निवडणुकीत विजयी झाल्या, तर भाजपाचे ज्येष्ठ नेते भावराव पगार, खासदारांचे भाचे सचिन जोपळे, कळवण पंचायत समितीचे सदस्य हिरामण पगार, माजी सरपंच गजराबाई राऊत, प्रशांत ठाकरे, माजी सरपंच परशुराम पगार यांचे पुतणे नितीन पाटील तसेच माजी सरपंच भास्कर पगार, बुधा जाधव, उद्योगपती मुरलीधर अमृतकार व मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष नितीन पगार यांच्या सौभाग्यवती यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या अनेक मान्यवर नेत्यांच्या कळवण नगरपंचायतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. उमेदवारी अर्ज भरण्यापासून चर्चेत राहिलेल्या या नगरपंचायतीने अपेक्षेप्रमाणे निकालानंतरही मतदारांना चकीत केले. प्रमुख विजयी :कौतिक पगार, माजी सभापती पंचायत समिती. सुनीता पगार, पंचायत समितीचे माजी सभापती कौतिक पगार यांच्या पत्नी.सुधाकर पगार, भाजपा तालुकाध्यक्ष कळवण. अतुल पगार, कळवण तालुका युवक कॉँग्रेस अध्यक्ष.साहेबराव पगार, शिवसेना शहरप्रमुख. सुरेखा जगताप, माजी जि.प.सदस्यमयूर बहिरम, माजी आमदार काशीनाथ बहिरम यांचे सुपुत्र अनिता जैन, माजी सरपंच सुनील जैन यांच्या पत्नी अनिता महाजन, कळवण मर्चण्ट बॅँकेचे संचालक सुनील महाजन यांच्या पत्नी.४अनुराधा पगार, राष्ट्रवादी शहराध्यक्ष जितेंद्र पगार यांच्या पत्नी.प्रमुख पराभूत :भावराव पगार, भाजपा जेष्ठ नेते.सचिन जोपळे,खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे भाचेहिरामण पगार, विद्यमान पंचायत समिती सदस्य महानंदा अमृतकार, मर्चट बॅँक माजी अध्यक्ष गजराबाई राऊत, माजी सरपंच कळवण विनायक पगार, संचालक कळवण बाजार समिती चांदवडला विद्यमान सदस्यांसह मान्यवर पराभूत

 

अपक्ष ३ विजयी : भाजपा ५, शिवसेना ३, कॉँग्रेस ४, राष्ट्रवादी २ चांदवड : नगर परिषदेच्या पहिल्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपाला पाच, शिवसेना तीन, कॉँग्रेस चार, राष्ट्रवादी कॉँग्रेस दोन, अपक्ष तीन असे १७ उमेदवार निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार मनोज देशमुख, मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांनी जाहीर केले. माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या पत्नी मीनाताई कोतवाल यांना सर्वाधिक ४८५ मते मिळाली, तर भाजपाचे विद्यमान अध्यक्ष भूषण कासलीवाल यांना दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे ४१४ मते मिळाली आहेत. शिवसेनेचे नेते संदीप उगले यांच्या पत्नी कविता संदीप उगले यांना ३५६ मते मिळवून त्यांनी तीन नंबरची मते घेतली. चांदवड नगर परिषदेत एकहाती सत्ता आली नसून अपक्षांच्या हाती नगराध्यक्ष असेल अशी वेळ आली आहे. ‘लोकमत’ने धक्कादायक निकाल लागतील व स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असे केलेले भाकीत अखेर खरे ठरले !(वार्ताहर)