शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

समिती धावपळीत आली अन् बैठक घेऊन गडबडीतच गेली..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:19 IST

तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे कामकाज तसेच पंचायत समितीच्या वेगवेगळ्या विभागाच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यासाठी पंचायतराज समिती सिन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आली होती. ...

तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे कामकाज तसेच पंचायत समितीच्या वेगवेगळ्या विभागाच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यासाठी पंचायतराज समिती सिन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आली होती. या समितीत अध्यक्ष आमदार संजय रायमुलकर, आमदार महादेव जानकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार दिलीप बनकर यांचा समावेश होता. पंचायत समितीत घेतलेल्या आढावा बैठकीस उपसचिव आठवले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, प्रतिवेदक विठ्ठल खर्चे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे उपस्थित होते. दीड तास पंचायत समितीत आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत, कृषी, इवद, पशू संवर्धन अशा सुमारे ११ विभागांचा आढावा घेण्यात आला. मुख्य अधिकाऱ्यांसह गटविकास अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत एकूण २८ प्रश्नापैकी २२ प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तथपि, समितीकडून तालुक्यातील विविध गावांत जाऊन तेथील ग्रामपंचायतींचे मूल्यमापन करणे टाळण्यात आले. सिन्नर पंचायत समिती पुरताच हा दौरा मर्यादित असल्याचे चित्र दिसून आले. पंचायत समितीतील बैठक आटोपल्यानंतर बारागावपिंप्री, के. पा. नगर येथे सत्कार स्वीकारून समिती निफाडकडे रवाना झाली. समितीकडून पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे मूल्यमापन केले जाते त्यामुळे ही समिती येणार म्हटल्यावर सर्वच विभागाचे अधिकारी व कर्मचारी चांगलेच धास्तावले दिसून येत होते. कामकाजात त्रुटी राह नयेत यासाठी सर्वांनी आधीच काळजी घेतल्याचे दिसून आले. पंचायत समितीच्या सभापती रोहिणी कांगणे यांच्यासह सदस्य जगन्नाथ भाबड, रवींद्र पगार, बाबासाहेब कांदळकर यांनी समिती सदस्य आमदारांची भेट घेऊन चर्चा केली. सभापती कांगणे यांनी विकासकामे करण्यासाठी आता अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या जागा शिल्लक नसल्याचे समितीला निदर्शनास आणून दिले.

चौकट-

मुख्यालयात राहण्याबाबत चर्चा

पंचायतराज समितीने घरकूल आढावा, विविध कामकाजे, आरोग्य शिक्षण याबाबत चर्चा केली. ग्रामसेवक व शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबत समितीचा आग्रह दिसून आला. प्रशासकीय कामाची माहिती घेतांना लोकांचे प्रश्न लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. लोकांना चकरा मारायला लावू नका, वेळेत कामे करा अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

चौकट-

माळेगाव ग्रामपंचायतीचे कौतुक

पंचायतराज समितीच्या सदस्यांनी माळेगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन विविध विकासकामे व उपक्रमांची माहिती घेतली. ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत, विविध सुविधा, शाळा, मोफत वायफाय, सुकन्या योजना, महिलांसाठी मोफत विमा, मोफत ऑनलाईन दाखले, सोलर वॉटर हिटर अशा विविध उपक्रमांची पाहणी करीत कौतुक केले. यावेळी सरपंच प्रिया सांगळे, उपसरपंच रामदास सांगळे, ग्रामविकास अधिकारी कैलास वाघचौरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

फोटो- २७ सिन्नर पंचायतराज

सिन्नर पंचायत समितीच्या आढावा बैठकीत बोलताना पंचायतराज समितीचे अध्यक्ष आमदार संजय रायमुलकर. समवेत महादेव जानकर, सदाभाऊ खोत, दिलीप बनकर, लीना बनसोड, मधुकर मुरकुटे यांच्यासह अधिकारी.

270821\27nsk_33_27082021_13.jpg

फोटो- २७ सिन्नर पंचायतराज  सिन्नर पंचायत समितीच्या आढावा बैठकीत बोलतांना पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संजय रायमुलकर. समवेत महादेव जानकर, सदाभाऊ खोत, दिलीप बनकर, लीना बनसोड, मधुकर मुरकुटे यांच्यासह अधिकारी.