शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

उमराणे ग्रामपालिका निवडणुकीवर आयोगाचा "वॉच"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:42 IST

उमराणे : दोन महिन्यांपूर्वी सरपंचपदाचा लिलाव व रामेश्वर मंदिर जीर्णोद्धार याबाबत वादग्रस्त ठरलेल्या उमराणे ग्रामपंचायतीसाठी नव्याने होत असलेल्या निवडणुकीच्या प्रत्येक हालचालींवर पोलीस प्रशासन व निवडणूक आयोगाकडून नजर ठेवली जात असून निवडणूक काळात आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना पोलीस प्रशासन व निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देप्रचाराची रणधुमाळी : पोलिसांकडून उमेदवारांना सूचना

उमराणे : दोन महिन्यांपूर्वी सरपंचपदाचा लिलाव व रामेश्वर मंदिर जीर्णोद्धार याबाबत वादग्रस्त ठरलेल्या उमराणे ग्रामपंचायतीसाठी नव्याने होत असलेल्या निवडणुकीच्या प्रत्येक हालचालींवर पोलीस प्रशासन व निवडणूक आयोगाकडून नजर ठेवली जात असून निवडणूक काळात आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना पोलीस प्रशासन व निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.सहा वॉर्डातून १७ जागांसाठी १२ मार्च रोजी होत असलेल्या उमराणे ग्रामपंचायतीची निवडणूक अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रचार सभा, रॅली, जमाव आदिंवर निर्बंध घालण्यात आल्याने विकासकामांचा वचननामा, मागील काळात केलेली विकासकामे व निवडणुुकीचे केंद्रबिंदू असलेल्या रामेश्वर मंदिर जीर्णोद्धार विषयीची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सोशल मीडियावर झडू लागल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन व निवडणूक आयोग सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या संदेशांकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल व्ही.गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर व निवडणूक अधिकारी व्ही.जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक लढविणाऱ्या दोन्ही गटातील प्रमुखांसह कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. गावातील घडामोडींवर उमराणे बिटचे सहायक पोलीस उपनिरीक्षक ए.बी. फसाले, पोलीस हवालदार एम.बी. बच्छाव, वाय.एन. क्षीरसागर, के.आर. पवार, डी.एल. गायकवाड लक्ष ठेवून आहेत.कठोर कारवाईचा इशाराबैठकीत निवडणूक काळात धार्मिक भावना दुखावणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे, जमावबंदीचे उल्लंघन करणे, सोशल मीडियावर टीकात्मक संदेश व्हायरल करणे आदी बाबी टाळाव्यात अन्यथा सदर बाबींचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक