नाशिकरोड : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम शनिवारी (दि.२६) नाशिकरोड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राप्त तक्रारीनुसार धोंगडे मळा येथील बंद व्यायामशाळेची मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लागलीच पाहणी करून व्यायामशाळा आठ दिवसांत सुरू करण्याचे आदेश दिले याशिवाय तेथील गोठ्याचे पत्र्याचे शेडचे अतिक्रमण तातडीने हटविण्याची कारवाई करण्यात आली. खोले मळा गवळीवाडा येथील बंद असलेल्या अभ्यासिका इमारतीची पाहणी करून आठ दिवसांत अभ्यासिका सुरू करण्याचे आदेश दिले. या उपक्रमांतर्गत १२७ तक्रारी, सूचना प्राप्त झाल्या.दत्तमंदिररोड मनपा शाळा क्र. १२५ च्या मैदानावर आयोजित उपक्रमात अनेक समस्या मांडण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने, गायखे कॉलनी उद्यानाची दुरवस्था, बिटको रुग्णालयात पुरेशी औषधे दिली जात नाही, सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग पट्टे व कॅमेरे नाहीत, जेलरोड मध्यवर्ती कारागृहासमोर, मुक्तिधाम-सोमाणी उद्यान परिसर, मस्जिद रोड, वास्को चौक, मालधक्का रोड येथील अतिक्रमण, जियाउद्दीन डेपो येथील अतिक्रमित भंगारची दुकाने, टाउन हॉल व्यवस्थित सुरू करावा, चेहेडी पंपिंग भगवा चौक क्रीडांगणाची दुरवस्था, सोमाणी उद्यान रस्ता वन-वे करावा, खासगी जागेत कथडा नसलेली धोकेदायक विहीर, रेजिमेंटल प्लाझा तळमजल्यावरील पार्किंगच्या बाहेर जाणारा मार्ग बंद आहे, टाकळीरोड इंद्रायणी सोसायटी, जयभवानीरोड हरिसागर रो-हाउस परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आदी तक्रारी, सूचना नागरिकांनी केल्या. यावेळीमुंढे यांनी नागरिकांनी सांगितलेल्या समस्या व सूचनांबाबत माहिती घेत लागलीच त्यांचा निपटारा करण्याचे आदेश दिले. जे प्रश्न मनपाच्या अखत्यारित नव्हते, खासगी मिळकत, अतिक्रमणाचे प्रश्न होते त्याबाबत मुंढे यांनी स्पष्ट शब्दात प्रश्नकर्त्यांना नकार दिला.
आयुक्तांचे आदेश :‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम बंद अभ्यासिका तत्काळ सुरू करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:50 IST
नाशिकरोड : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम शनिवारी (दि.२६) नाशिकरोड येथे आयोजित करण्यात आला होता.
आयुक्तांचे आदेश :‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम बंद अभ्यासिका तत्काळ सुरू करा !
ठळक मुद्देव्यायामशाळा आठ दिवसांत सुरू करण्याचे आदेश उपक्रमांतर्गत १२७ तक्रारी, सूचना प्राप्त झाल्या