शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांचे ‘आॅपरेशन पाणीपुरवठा’ पाहणी : बारा बंगला जलशुद्धिकरण केंद्राच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:35 IST

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी (दि. ८) ‘आॅपरेशन पाणीपुरवठा’ राबवत जलशुद्धिकरण केंद्रांसह काही जलकुंभांची पाहणी केली.

ठळक मुद्देआधुनिकी-करणासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे आदेश जलकुंभ, पम्प हे स्वच्छ करण्याचे वर्षाचे वेळापत्रक

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी (दि. ८) ‘आॅपरेशन पाणीपुरवठा’ राबवत जलशुद्धिकरण केंद्रांसह काही जलकुंभांची पाहणी केली आणि कामात कुचराई करणाऱ्या मक्तेदारांसह अधिकारी-कर्मचारी वर्गाला आपल्या धडक कार्यपद्धतीचा हिसका दाखविला. दरम्यान, गावठाण भागात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत चोवीस तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने बारा बंगला जलशुद्धिकरणाच्या आधुनिकी-करणासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना दिले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी सकाळी बारा बंगला जलशुद्धिकरण केंद्रापासून पाहणी दौºयास सुरुवात केली. यावेळी आयुक्तांना आवारात पालापाचोळा, कचºयाचे दर्शन झाले. त्याबाबत त्यांनी अधिकारी व कर्मचाºयांना जाब विचारला आणि तीन दिवसात परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे भूस्तर जलकुंभाची आयुक्तांनी स्वत: त्यामध्ये उतरून पाहणी केली व जलकुंभाच्या आवारातील प्रत्येक इमारत, जलकुंभ, पम्प हे स्वच्छ करण्याचे वर्षाचे वेळापत्रक तयार करण्याचे आदेशित केले. शहरातील गावठाण भागात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत चोवीस तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी पाणीपुरवठा बारा बंगला जलशुद्धिकरण केंद्रातून होणार आहे. चोवीस तास पाणीपुरवठा करताना पाण्याची शुद्धता असणे व आवश्यक त्या दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य उंचीचा जलकुंभ असणे आवश्यक आहे. मात्र, बारा बंगला जलशुद्धिकरण केंद्रात एरीएशन फाउंटन नाही तसेच क्लोरिनेशन सिस्टीम जुन्या पद्धतीची असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यासाठी बारा बंगला येथे एरीएशन फाउंटन घ्यावे, तसेच जलशुद्धिकरण केंद्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी आॅटोमेशनची सर्व कामे व योग्य त्या उंचीचा जलकुंभ बांधणे, फिल्टर हाउसमधील वाया जाणाºया बॅकवॉशचा पुनर्वापर करण्याची यंत्रणा उभारणे आदी कामांची तातडीने प्राकलने करून ती कामे स्मार्ट सिटीमधून करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले. आयुक्तांनी तिडके कॉलनीत सुरू असलेल्या जलकुंभाचीही पाहणी केली. यावेळी तेथील कॉँक्रीटमध्ये वापरण्यात येणाºया खडी व वाळूची तपासणी केली असता, कनिष्ठ अभियंता, उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांना समाधानकारक उत्तर देत आले नाही.जलकुंभामध्ये उतरून पाहणीबारा बंगला जलशुद्धिकरण केंद्रातील भूस्तर जलकुंभाची आयुक्तांनी स्वत: त्यामध्ये उतरून पाहणी केली व दुुरुस्तीच्या सूचना केल्या. प्रत्येक टाक्यांची स्वच्छता वेळच्या वेळी झाली पाहिजे, अशी ताकीदही त्यांनी अधिकाºयांना दिली. जलशुद्धिकरण केंद्राच्या आवारात असलेले डेब्रीज उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचे आदेशित केले. याशिवाय केंद्राच्या युनिटनिहाय इनलेट चेंबरपासून ते क्लोरिनेशन युनिटपर्यंत सविस्तर बारकाईने पाहणी केली.