शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बेडस्‌ची माहिती घेण्यासाठी आयुक्त पीपीई किट घालून रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:15 IST

नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, दिवसाकाठी अडीच ते तीन हजार रुग्ण आढळत आहेत. यात सर्वाधिक रुग्ण नाशिक शहरात ...

नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, दिवसाकाठी अडीच ते तीन हजार रुग्ण आढळत आहेत. यात सर्वाधिक रुग्ण नाशिक शहरात आढळत आहेत. ८० ते ८५ टक्के रुग्ण घरीच उपचार घेत असल्याचे सांगितले जात असले तरी उर्वरित ज्या गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल व्हायचे आहे, त्यांना बेडस्‌ मिळत नसल्याच्या तक्रारी महापालिकेच्या हेल्पलाइनवरून प्राप्त होत होत्या. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त कैलास जाधव यांनी बुधवारीच (दि.२४) ऑडिटर्स आणि अभियंत्यांना खासगी रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर गुरुवारी डॉ. शिंदे नाशिकमध्ये आल्यांनतर आयुक्त कैलास जाधव आणि त्यांनी संयुक्तरीत्या खासगी रुग्णालयात जाऊन तपासणी केली.

यावेळी एचआरसीटीचा स्कोअर सातपेक्षा अधिक असेल, तर कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असताना काही ठिकाणी त्यापेक्षा कमी स्कोअर असलेले रुग्णही दाखल असल्याचे आढळले, तसेच काही ठिकाणी ८०:२० सूत्रानुसार रुग्ण दाखल होत नसल्याचे आढळले आहे. यावेळी डॉ. विजय पावस्कर, विभागीय अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आदी उपस्थित होते.

===Photopath===

250321\25nsk_45_25032021_13.jpg

===Caption===

शहरातील खासगी रूग्णालयांमधील बेडसची माहिती घेताना ज्याचे कोविड बेड मॅनेजमेंटचे प्रमुख डॉ.सुधाकर शिंदे आणि आयुक्त कैलास जाधव आदी