शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त : नोव्हेंबर १४ नंतरच्या प्रकरणांचे वर्गीकरण

By admin | Updated: September 18, 2016 00:38 IST

‘कपाट’प्रकरणी बेकायदेशीर बांधकामास अभय नाही

नाशिक : शासनाकडून विकास नियंत्रण नियमावली मंजूर झाल्यानंतरच ‘कपाट’प्रकरणी ठोस निर्णय घेणे शक्य होणार आहे. मात्र, या प्रकरणात ज्यांनी बेकायदेशीरपणे बांधकामे केली असतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल आणि जी प्रकरणे नियमात बसतील ती नियमित करण्यास प्राधान्य राहणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.इमारत बांधकामातील ‘कपाट’प्रकरणी पर्याय शोधण्यासाठी आयुक्तांनी अभ्यासगटाची निर्मिती केली असून त्यांच्याकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. सदर ‘कपाट’ प्रकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना आयुक्त कृष्ण यांनी सांगितले, विकास नियंत्रण नियमावली मंजुरीनंतरच याप्रकरणी निर्णय घेणे शक्य होणार आहे. नाशिक शहरात ‘कपाट’ प्रकरणामुळे किती पूर्णत्वाचे दाखले अडकले आहेत त्याची एकत्रित माहिती नगररचना विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे नोव्हेंबर २०१४ नंतरची प्रकरणांची माहिती घेण्याचे निर्देश नगररचना विभागाला देण्यात आले आहेत. ‘कपाट’ प्रकरणांची संपूर्ण माहिती हाती आल्याशिवाय पुढचा निर्णय घेता येणार नाही. या प्रकरणामुळे किती लोक बाधित झाले आहेत, किती प्रकरणांमध्ये पूर्णत्वाचे दाखले प्रलंबित आहेत, जुन्या विकास नियंत्रण नियमावलीवर आधारित किती प्रकरणे नियमित होऊ शकतील, नवीन टीडीआर धोरण आणि येणाऱ्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार किती प्रकरणे नियमित होतील याबाबतचे वर्गीकरण-विश्लेषण प्रत्येक प्रकरणनिहाय करावे लागणार आहे. त्यानंतरच जे नियमात बसू शकतील अथवा एफएसआयचे खूप मोठे उल्लंघन झाले नसेल, अशी प्रकरणे आयुक्तांच्या अधिकारात नियमित करता येऊ शकतील.