शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कमिशन बारा रुपये, खर्च ५१ रुपये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:51 IST

फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थींनाच प्रतिकार्ड एक किलो साखर दरमहा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका रेशन दुकानदारांनाच बसू लागला असून, चार ते चाळीस किलोपर्यंत दरमहा साखर वाटपासाठी मिळणाºया दुकानदारांना मात्र चलन भरताना साखरेच्या मिळणाºया कमिशनपेक्षा चार ते चाळीस पट जादा रक्कम बॅँकेत भरण्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. दुकानदारांच्या या आर्थिक व्यथेशी कोणतेही सोयरसुतक नसलेले पुरवठा खाते मात्र साखर न उचलणाºया दुकानदारांना नोटिसा पाठवून मानसिक छळ करीत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

नाशिक : फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थींनाच प्रतिकार्ड एक किलो साखर दरमहा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका रेशन दुकानदारांनाच बसू लागला असून, चार ते चाळीस किलोपर्यंत दरमहा साखर वाटपासाठी मिळणाºया दुकानदारांना मात्र चलन भरताना साखरेच्या मिळणाºया कमिशनपेक्षा चार ते चाळीस पट जादा रक्कम बॅँकेत भरण्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. दुकानदारांच्या या आर्थिक व्यथेशी कोणतेही सोयरसुतक नसलेले पुरवठा खाते मात्र साखर न उचलणाºया दुकानदारांना नोटिसा पाठवून मानसिक छळ करीत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.  सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत अंत्योदय योजनेच्या लाभार्थींनाच प्रतिकार्ड एक किलो साखर देण्यात येत असल्यामुळे अंत्योदय योजनेच्या लाभार्थींची संख्या पाहता प्रत्येक रेशन दुकानदारास चार ते चाळीस किलो या प्रमाणातच दर महिन्याला साखरेचा कोटा दिला जातो. या साखरेसाठी दुकानदारांना साखरेवर मिळणाºया कमिशनची रक्कम वजा जाता उर्वरित रकमेचे चलन म्हणजेच बॅँकेत जाऊन पैसे भरावे लागतात. सध्या रेशनवर मिळणाºया साखरेचा दर २० रुपये किलो इतका असून, त्याच्या विक्रीतून दुकानदारास एका किलोमागे दीड रुपया कमिशन म्हणून मिळतो. म्हणजे एका दुकानदाराला जर चार किलोच साखरेचा कोटा मंजूर असेल तर त्याने सहा रुपये कमिशनचे वजा करून ५४ रुपये चलनाद्वारे भरणे अपेक्षित आहे. परंतु ज्या राष्टÑीयीकृत बॅँकेत रेशन दुकानदारांना चलन भरावे लागते त्यात कमीत कमी ३०१ रुपयांचे चलन भरावे लागते. राष्टÑीयीकृत बॅँका तीनशे रुपयांच्या आतील रक्कम चलनाद्वारे भरून घेत नाही. त्यामुळे दुकानदाराला तीनशे रुपयांहून अधिक रक्कम बॅँकेत चलनाद्वारे भरली तरच पुरवठा खाते त्यांना परमीट अदा करते ही वस्तुस्थिती आहे. म्हणजेच रेशन दुकानदाराला चार किलो साखरेच्या सहा रुपये कमिशनसाठी तीनशे रुपयांचा भुर्दंड बसत आहे. त्यामुळे बºयाचशा दुकानदारांना हा घाट्याचा व्यवसाय वाटू लागला असून, ज्यांना चार ते वीस किलोपर्यंत दरमहा साखर मिळते व ज्यांना तीनशे रुपयांच्या आत कमिशनची रक्कम मिळणार आहे अशा दुकानदारांना घरातून रक्कम भरून अंत्योदयच्या लाभार्थींना साखर वाटप करावी लागत आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून दुकानदार नाखुशीने साखरेची उचल करीत असून, काहींनी याच कारणास्तव साखर न उचलल्याने पुरवठा खात्याने त्यांना नोटिसा पाठवून फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे.