शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाइकाच्या बदलीवरून शिक्षणाधिकाऱ्यांवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:01 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी स्वत:च्या शिक्षक भावजईची दुर्गम ठिकाणाहून सोयीच्या ठिकाणी बदली केल्याची टीका गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत असून, त्यासाठी त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचे म्हटले आहे. मात्र सदरची बदली ही नियमानुसार व कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच केली गेल्याचा दावा झनकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देसोशल माध्यमावर व्हायरल : अधिकाऱ्यांकडून मात्र इन्कार

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी स्वत:च्या शिक्षक भावजईची दुर्गम ठिकाणाहून सोयीच्या ठिकाणी बदली केल्याची टीका गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत असून, त्यासाठी त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचे म्हटले आहे. मात्र सदरची बदली ही नियमानुसार व कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच केली गेल्याचा दावा झनकर यांनी केला आहे.शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या भावजई ऊर्मिला उशीर यांची मागील वर्षी पेठ तालुक्यातील काळुस्ते या गावातील शाळेत जिल्हांतर्गत आॅनलाइनने बदली झाली होती. विस्थापित गटात त्यांची बदली झाल्यामुळे त्या कोळुस्ते येथे रुजू झाल्या होत्या. मात्र वर्षभरातच यंदाच्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये उशीर यांची बदली त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुरंबी येथे झाली आहे. मुरंबी येथे बदली झाल्यानंतर दुसºयाच दिवशी तेथे हजर होऊन दुसºया दिवशी जिल्हा संशोधन व प्रशिक्षण संस्था नाशिक (डायट)कडे तंत्रस्नेही म्हणून प्रतिनियुक्तीवर रुजू झाल्या आहेत. पेसा क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांना प्रतिनियुक्तीवर घेता येत नाही. असे असताना ऊर्मिला उशीर यांची प्रतिनियुक्ती झालीच कशी, असा सवाल करण्यात आला आहे. डायट संस्थेकडे प्रतिनियुक्तीवर घेतल्या जाणाºया शिक्षकांची विद्या प्राधिकरण (एमएससीईटी) पुणे यांच्याकडून मुलाखती घेऊन नेमणूक केली जाते. चालू वर्षी अद्याप तशी प्रक्रिया राबविली गेली नसताना ऊर्मिला उशीर यांची नेमणूक थेट करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी झनकर यांच्याकडे सध्या डायट प्राचार्य पदाचाई-चार्ज आहे. त्यामुळे त्यांनी पदाचा दुरुपयोग करून ही बदलीकेल्याचा आरोप केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट वेगाने व्हायरल केली जात असून, त्याद्वारे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.जिल्हा परिषदेने गेल्या महिन्यात १३८८ आॅनलाइन बदल्या केल्या असून, त्यानंतर जवळपास ३५० शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. परंतु यातील एकाही बदलीबाबत तक्रार समोर आलेली नाही. अशातच शिक्षणाधिकाºयांची नातेवाईक म्हणून एकमेव बदलीचे प्रकरण पुढे आले आहे. या संदर्भात शिक्षणाधिकारी झनकर यांना विचारणा केली असता, शिक्षक ऊर्मिला उशीर यांची गेल्या वर्षी विस्थापित गटात पेठ तालुक्यात बदली झाली होती. त्याचवेळी त्यांनी डायटकडे प्रतिनियुक्तीसाठी अर्ज केला होता. उशीर यांच्यासह तिघांनी असे अर्ज केले होते. त्यातील एकाने नंतर अर्ज मागे घेतला व उशीर यांचा अर्ज कायम राहिला. यंदा शिक्षकांच्या बदल्या करताना गेल्या वर्षी जे विस्थापित शिक्षक झाले त्यांना प्राधान्य देण्यात आले होते. ही सारी प्रक्रिया कायदेशीर व नियमानुसार पार पडली असून, त्यात नातेवाइकाला कोणताही गैरवापर करण्यात आला नसल्याचे झनकर यांनी सांगितले.‘त्या’ गटशिक्षणाधिकाºयांना नोटीसदेवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील शाळेत शिक्षक नेमणुकीवरून पालकाने संवाद साधला असता देवळ्याच्या गटशिक्षणाधिकारी धनगर यांनी उर्मटपणे उत्तरे दिल्याची आॅडिओ क्लिपदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याची दखल घेत शिक्षणाधिकारी झनकर यांनी गटशिक्षणाधिकारी धनगर यांना शो कॉज नोटीस बजावली आहे.