शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी सोडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:26 IST

येवला : तालुक्यातील बोकटे येथे श्री कालभैरवनाथ यात्रोत्सवासाठी लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लेखी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार महाजन यांच्या आदेशानंतर यात्रेसाठी तत्काळ पाणी सोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देबोकटे यात्रोत्सवपालकमंत्र्यांना शिष्टमंडळाचे निवेदन

येवला : तालुक्यातील बोकटे येथे श्री कालभैरवनाथ यात्रोत्सवासाठी लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लेखी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार महाजन यांच्या आदेशानंतर यात्रेसाठी तत्काळ पाणी सोडण्यात आले आहे.यासंदर्भात येवल्याच्या शिष्टमंडळाने महाजन यांची भेट घेतली. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, येवला पंचायत समितीचे माजी सभापती रामदास पाटील, काळे, बाळासाहेब लोखंडे उपस्थित होते. आमदार छगन भुजबळ यांनी जलसपंदा मंत्री गिरीश महाजन यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ७ एप्रिल २०१८ पासून बोकटा, ता. येवला, जि. नाशिक येथे श्री कालभैरवनाथ यात्रोत्सव होत आहे. या परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. दररोज परिसरातील हजारो नागरिक येथील यात्रेला येत असतात. मागील वर्षातील भीषण दुष्काळाचा अपवाद वगळता येथील नागरिक व यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून दरवर्षी पाणी सोडले जाते. पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नामुळे यात्रेसाठी पाणी सोडण्याची ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधींची आग्रही मागणी आहे. त्यामुळे येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन लवकरात लवकर पालखेड डावा कालव्याद्वारे प्रासंगिक आरक्षणाचे पाणी सोडण्यात यावे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यानंतर तत्काळ राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बोकटे यात्रेसाठी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.