शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
3
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
4
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
5
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
6
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
7
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
8
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
9
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
10
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
11
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
12
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
13
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
14
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
15
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
16
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
17
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
18
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
19
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
20
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन

कादवा कारखाना सुरु राहण्यासाठी एकत्र या

By admin | Updated: September 25, 2016 23:24 IST

वार्षिक सभा : अडथळे आणून संस्थेचे नुकसान न करण्याचे श्रीराम शेटे यांचे विरोधकांना आवाहन

दिंडोरी : राज्यात साखर कारखाने बंद पडत असताना कादवा सहकारी साखर कारखाना काटकसर व पारदर्शी कारभार करत सुस्थितीत आणून दिमाखात सुरू ठेवला आहे. मात्र असे असतानाही विरोधक अर्जफाटे करत संस्थेला अडचणीत आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. हे योग्य नसून काय प्रश्न विचारायचे ते वार्षिक सभेत विचारावे व कारखाना सुरू ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. अडथळे आणून संस्थेचे नुकसान करू नका, असे आवाहन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले.कादवा सहकारी साखर कारखान्याची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून शेटे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले, व्हा. चेअरमन उत्तम भालेराव, माजी चेअरमन अ‍ॅड. बाजीराव कावळे, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, उपसभापती अनिल देशमुख, जि. प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सुरेश डोखळे, संचालक बापूराव पडोळ, त्रंबक संधान, सुनील केदार, बाळकृष्ण जाधव, मधुकर गटकळ, दिनकर जाधव, शहाजी सोमवंशी, विश्वनाथ देशमुख, शिवाजी बस्ते, सुकदेव जाधव, सुभाष शिंदे, शांताबाई पिंगळ, चंद्रकला घडवजे, संदीप शार्दुल, सोमनाथ कावळे, कार्यकारी संचालक बाळासाहेब उगले आदि मान्यवर उपस्थित होते.अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी प्रास्ताविकात कामकाजाचा आढावा घेत शासन धोरण व विरोधकांच्या अर्जफाट्यामुळे कामकाजात अडचण होत असल्याचे सांगितले. नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम वाढीव खर्च, झालेला नफा-तोटा, नव्याने केलेले सभासद, शैक्षणिक संस्था कामकाज आदि विषयांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.यावेळी माजी चेअरमन अ‍ॅड. बाजीराव कावळे यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. तसेच माजी आमदार धनराज महाले, नरेंद्र जाधव, संजय कावळे, विलास निरगुडे, राजेंद्र उफाडे यांनीही प्रश्न विचारले. त्यास श्रीराम शेटे यांनी उत्तरे दिली.करोडो रु पये कर कारखान्यांच्या माध्यमातून मिळत असताना सरकार मदतीऐवजी अडचणी निर्माण करत आहे. साखर विक्रीबाबतही शासनाचे जाचक नियम झाले असून, साखर विक्रीची सक्ती करत आहे. शासनाच्या नियमानुसार विक्र ी केली नाही तर ती साखर जप्त होईल व संचालक मंडळाला तुरु ंगाची हवा खावी लागेल हे सारे अजब असून, उत्पादकांवर विक्रीची सक्ती हे प्रथमच घडत आहे. या चुकीच्या धोरणामुळे कारखाने अडचणीत आले असल्याचे शेटे यांनी सांगितले. कारखाना सुरळीत ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सभासद मोठ्या संखेने उपस्थित होते आभार जिल्हा बॅँक संचालक गणपतराव पाटील संचालक शहाजी सोमवंशी यांनी मानले. (वार्ताहर)