शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संपाला ‘समृद्धी’ची जोड

By admin | Updated: June 1, 2017 01:25 IST

राज्यातील दहा जिल्ह्णांमधून जाणाऱ्या व हजारो शेतकऱ्यांना बाधित करणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या विरोधाची जोड देण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गुरुवारपासून सुरू होणाऱ्या शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाची व्याप्ती वाढविण्यासाठी राज्यातील दहा जिल्ह्णांमधून जाणाऱ्या व हजारो शेतकऱ्यांना बाधित करणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या विरोधाची जोड देण्यात आली असून, शेतकरी कर्जमुक्ती व बिनव्याजी कर्जपुरवठ्याच्या मागणीबरोबरच समृद्धी महामार्ग रद्द करण्यावरही शेतकऱ्यांनी भर दिला आहे. शेतमालाचे घसरलेले भाव, कर्जबाजारीपणा, नापिकी यामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असून, त्यात दिवसागणिक वाढ होत चालली आहे. शासन दरबारी वेळोवेळी शेतमालाला हमी भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी पाठपुरावा व आंदोलने करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची मागणी करण्यात आली, त्यासाठी विरोधी पक्षांनी राज्यव्यापी संघर्ष यात्रा काढूनही काहीच उपायोग होत नसल्याचे पाहून शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला असून, चालू खरीप हंगामात कोणतेही पीक न घेण्याचे ठरविण्यात आले व त्याची सुरुवात १ जून म्हणजेच मान्सूनच्या तोंडावर करण्यात येत आहे. राज्यातील दहा जिल्ह्णांमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे हजारो शेतकरी बाधित होणार असून, त्यांनी या मार्गाला उघड उघड विरोध दर्शविला आहे. अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांनाही संपात सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यामुळेच की काय संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये समृद्धी महामार्ग रद्द करा ही मागणीही समाविष्ट करण्यात आली आहे. या संपात सक्रिय असलेल्या किसान सभेने शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी ‘समृद्धी कुणाची, शेतकऱ्यांची की सरकारची?’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्याचे निश्चित केले आहे. शेतकरी संपाला पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांना या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आल्याने समृद्धीचे पाठबळही वाढणार आहे.