शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचा बसेना मेळ अन् टोमॅटोचा झाला खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:19 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे कांदा, टोमॅटो. या पिकावर शेतकऱ्यांचे पुढील अर्थचक्र अवलंबून असते पण ...

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे कांदा, टोमॅटो. या पिकावर शेतकऱ्यांचे पुढील अर्थचक्र अवलंबून असते पण सहा महिने कांदा साठवणूक करूनही त्यातून चार पैसे पदरात पडत नसतील तर कांदा साठवणूक करायची कशाला? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. कारण गत दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना साठवणूक केलेल्या कांद्यातून तोटाच सहन करावा लागत आहे.

अडीच हजारावर गेलेला कांदा सहा महिने चाळीत ठेवूनही शेतकऱ्यांना सरासरी बाराशे ते तेराशे भावाने विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडल्याने पुढील खरिपातील लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच कांदा चाळीत मोठ्या प्रमाणात सडत असल्याने याचा तोटाही शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शासनाने शेतकऱ्यांना कांदाचाळी उभारण्यासाठी अनुदान दिले, याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला आणि शेतकऱ्यांनी कांदा चाळीची उभारणी केली, पण हाच कांदा सहा महिने चाळीत ठेवूनही तोट्यावर विकावा लागत असेल त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर होत आहे.

साठवून ठेवलेल्या कांद्यातून चार पैसे होतील व त्या पैशावर आपण पुढील पिके उभे करू या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा मात्र तोंडचा घास पळाला असून पुढील पिके उभी करण्यासाठी आहे त्या भावाने कांदा विकावा लागत आहे.

मागील वर्षी शेतकऱ्यांना टोमॅटोतून बऱ्यापैकी पैसे मिळाले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडी केल्या, एक एकर टोमॅटो पीक उभे करण्यासाठी साधारणपणे एक लाखाच्या आसपास खर्च येतो. यामध्ये ड्रीप, बांबू, तार, मल्चिंग पेपर, सुताळी, मजुरी असा खर्च करून शेतकऱ्यांना आज मात्र या टोमॅटो पिकातून खर्चदेखील वसूल होत नसल्याने त्यांच्यावर टोमॅटो पिकामध्ये नांगर घालण्याची वेळ आली आहे.

कोट...

आतातर अनेक शेतकऱ्यांनी तर जनावरांचा चारा म्हणून टोमॅटोचा उपयोग केला आहे. एकूणच कांदा आणि टोमॅटोच्या आगारात शेतकऱ्यांचे मात्र आर्थिक गणित बिघडले असून मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया

भाववाढीच्या आशेने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कांदा साठवणूक केली, पण आता दिवसेंदिवस कांदा खराब होत असून आधीच अडीच हजारावर गेला कांदा सरासरी बाराशे ते तेराशे रुपयांवर आल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

-

मल्हारी दराडे, कांदा उत्पादक शेतकरी. (०६ टमाटा, ०६ कांदा)

060921\205106nsk_26_06092021_13.jpg~060921\205106nsk_27_06092021_13.jpg

चाळीत सडत असलेला कांदा.~टमाटा.