शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

गोवयांमध्येच रंगतात ‘त्यांचे’ होळीचे रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:01 IST

संपूर्ण देश होळीच्या सप्तरंगी रंगांची उधळण करून आपल्या सोनेरी आयुष्यात रंग भरत असताना दुसरीकडे याच देशातील आदिवासी कष्टकरी जनता मात्र शेण व गोवºयांमध्येच आपले बेरंग झालेले जीवन रंगीन करताना दिसून येत आहे.

पेठ : संपूर्ण देश होळीच्या सप्तरंगी रंगांची उधळण करून आपल्या सोनेरी आयुष्यात रंग भरत असताना दुसरीकडे याच देशातील आदिवासी कष्टकरी जनता मात्र शेण व गोवºयांमध्येच आपले बेरंग झालेले जीवन रंगीन करताना दिसून येत आहे.  देशभर होलिकोत्सव दरवर्षी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. ग्रामीण भागाबरोबर शहरी वस्तीत या सणाची रंगत आधिक दिसून येते. शहरात चौकाचौकात, सोसायट्या, बंगले व चाळीत होळी साजरी केली जाते. यासाठी लागणाºया गोवºया पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या आदिवासी तालुक्यातील कष्टकरी मजूर होळीच्या आदल्या दिवशी घेऊन शहरात दाखल होत असतात. वरवर साध्या दिसणाºया या गोवºया जवळपास सहा महिन्यांपासून थापायला सुरुवात करावी लागते. दिवाळीचा सण झाल्यापासून गायी, म्हशींच्या शेणापासून व त्यात गवत टाकून गोवºया थापतात. एक एक गोवरी वाळवून त्याचा साठा करून ठेवला जातो. होळीच्या पूर्वसंध्येला भाडोत्री वाहनातून गोवºया नाशिकच्या पंचवटी, पेठरोड, गंगाघाट आदी ठिकाणी रस्त्यावर जागा मिळेल तेथे विक्रीसाठी ठेवल्या जातात. रक्ताचे पाणी करून तयार केलेल्या गोवºया विकून कुटुंबाचा चरितार्थ भागविण्यात येतो.गावाकडे होळीची पारंपरिक यात्रा, सण सोडून अनेक कुटुंब ऐन सणवाराला रस्त्यावर वास्तव्य करून राहतात. वर्षभराची पोटाची खळगी भरण्यासाठी सणाचा आनंद बाजूला ठेवून आदिवासी कष्टकरी गोवºया विकण्यात दंग असतात. चारशे रुपये शेकड्यापासून या गोवºयांना भाव मिळत असला तरीही होळीच्या दिवशी शिल्लक गोवºया मिळेल त्या भावात विकून घराची वाट धरतात.

टॅग्स :Holi 2018होळी २०१८