शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवारी होणार रंगयुद्ध : ढोलताशाच्या गजरात रंगांची उधळण रंगपंचमीसाठी येवला सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:58 IST

येवला : उत्सवप्रेमींचे शहर म्हणून येवला शहर ओळखले जाते. रंगपंचमीनिमित्त निर्माण होणारे इंद्रधनुष्याचे मनोहारी दृश्य केवळ वर्णन करून भागणार नाही.

ठळक मुद्देमहिलादेखील रंग खेळण्यात आघाडीवररंग खेळणाºयांची संख्याही वाढली

येवला : उत्सवप्रेमींचे शहर म्हणून येवला शहर ओळखले जाते. रंगपंचमीनिमित्त निर्माण होणारे इंद्रधनुष्याचे मनोहारी दृश्य केवळ वर्णन करून भागणार नाही, तर रंगपंचमीची मजा लुटण्यासाठी येवल्याला यावे लागेल. या दिवशी सकाळपासूनच गल्लीबोळात परस्परांवर रंग टाकत स्वत:चीच तोंडे आकर्षक पद्धतीने रंगवून घेत युवक-युवतींचे थवे फिरत असतात. महिलादेखील रंग खेळण्यात आघाडीवर असतात. रंगपंचमी आली की शहरातील दोन्ही दिशेच्या तालमी आणि विविध मंडळे परस्परांच्या विरुद्ध दिशेने येऊन बैलगाडीवर ठेवलेल्या पिंपांतील रंग ढोलताशा, हलकडीच्या गजरात परस्परांवर उधळून मजा लुटतात. किमान ४० ते ५० बैलगाड्या व त्यावर असणाºया पिंपांतील रंगांचे सपके परस्परांवर मारून रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. गेल्या २० ते २५ वर्षांपासून बैलगाड्यांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीमुळे पिंपांची संख्या वाढली आहे. रंग खेळणाºयांची संख्याही वाढली आहे. रंगाचा पहिला सामना मंगळवारी (दि.६) सायंकाळी ५ वाजता टिळक मैदानात होईल. ढोलताशांच्या गजरात जोशपूर्ण वातावरणात प्रत्येक तरुण रंगात न्हाऊन निघणार आहे. डी.जे. रोडवर एक सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. रंगपंचमीचा उत्साह दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा या पारंपरिक रंगांचे सामने आनंदाने उत्साहात पार पडावेत म्हणून विविध नेतेमंडळी, पहिलवान काळजी घेत आहेत.होळी ते रंगपंचमी अशा पाच दिवसात बालाजी मंदिराच्या प्रांगणात बालाजीचा उत्सव धूमधडाक्यात साजरा होतो. आराध्य दैवत बालाजी यांना पाळण्यात बसविले जाते. सोबत मंडप, विद्युत दिव्यांचा झगमगाट असतो. परंपरागत पणत्यांची रोषणाई वेगळीच छाप पाडते. या पणत्यांच्या तेलासाठी आजही येवल्यातील गंगाराम छबीलदासशेठ पेढीतून खर्च दिला जातो. ही एक जुनी परंपरा आहे. या पेढीतील व्यक्ती आजही रंगपंचमीच्या दिवशी रात्री ८ वाजता बालाजी मंदिर परिसरात येतात. बालाजीच्या अंगावर रंग व गुलाल उधळतात. या मंदिराचे पुजारी बालाजीचे दूत बनून शेठजींच्या अंगावर रंग उडवतात. देव आणि मानव यांच्यात जणूकाही प्रातिनिधिक स्वरुपात रंगपंचमी खेळली जाते. अनेक वर्षांची ही परंपरा आजही तेवढ्याच उत्साहाने सुरू आहे हे विशेष. रात्री ८ वाजता क्षत्रिय गल्लीतून ढोलताशांच्या गजरात सटवाईच्या सोंगाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सटवाई देवतेपुढे वेताळाचे सोंग घेण्याची येथील यमासा क्षत्रिय यांच्या कुटुंबाची प्रथा आहे.