शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराने आणली रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 23:08 IST

न्या. रानडे महोत्सवानिमित्त वैनतेय इंग्लिश मीडिअम स्कूल, वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर, वैनतेय शिशुविहार आदी शाखांचे सांस्कृतिक कार्यक्र म संपन्न झाले.

ठळक मुद्देसांस्कृतिक कार्यक्रम : निफाडला न्या. रानडे महोत्सवांतर्गत विविध स्पर्धा

निफाड : येथील न्या. रानडे महोत्सवानिमित्त वैनतेय इंग्लिश मीडिअम स्कूल, वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर, वैनतेय शिशुविहार आदी शाखांचे सांस्कृतिक कार्यक्र म संपन्न झाले.महोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन घडवत सर्वांची मने जिंकली. यश कुंदे आणि ईश्वरी चोभे या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. शिवांजली शिंदे हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित स्वगत सादर केले. राधे राधे, मेरा जुता है जपानी, सुनो गौर से दुनियावालो, नमो नमो शंकरा, सूर निरागस हो, शेंदूर लावा म्हसोबाला, हरवली पाखरे, भाऊ मना सम्राट, खंडोबाची गीते आदी विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी वैयक्तिक तसेच समूह नृत्य सादर केले. यासह कथक नृत्य, गरबा नृत्य, कोळी नृत्य सादर केले. विद्यार्थिनी कावेरी नागरे हिने संगीताच्या तालावर रिदमिक योगा सादर केला. लावण्या शिंदे हिने महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर बेटी बचाव हे स्वगत सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व समूह गीत गायन करून उपस्थितांची वाहवा मिळवली.यावेळी कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद पाटील कराड, संस्थेचे विश्वस्त आप्पासाहेब उगावकर, वि. दा. व्यवहारे, रतन पाटील वडघुले, राजेंद्र राठी, किरण कापसे, दिलीप वाघवकर, राजेश सोनी, मधुकर राऊत, विश्वास कराड, प्राचार्य डी.बी. वाघ, उपप्राचार्य रविकांत कर्वे, पर्यवेक्षक एस. एम. सोनवणे, प्राचार्य देवेंद्र सांबरे, पर्यवेक्षक पल्लवी सानप, मुख्याध्यापक सुजाता तनपुरे, मुख्याध्यापक प्रसन्ना कुलकर्णी आदींसह पालक उपस्थित होते.रांगोळी स्पर्धांना प्रतिसादन्या. रानडे महोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी निसर्गचित्र, फुलांची रांगोळी, ताटातील पाण्यात काढलेली रांगोळी आदी प्रकारात रांगोळ्या रेखाटून करून स्री भ्रूणहत्या थांबवा, लेक वाचवा, पृथ्वी वाचवा, झाडे वाचवा आदी सामाजिक संदेश दिले. या प्रदर्शनाला पालकांनी भेट पाहणी केली. रांगोळी स्पर्धेचे संयोजन सांस्कृतिक विभागप्रमुख एम. एस. पवार, भारती लंबाते, एस.एस. कापसे, संगीता चौधरी, एस.एन. पटेल, जी.जे. पंड्या यांनी केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक