शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वसाहत सरकारी; रहिवासी भाडेकरी

By admin | Updated: March 26, 2017 23:56 IST

इंदिरानगर :पांडवनगरी परिसरात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या सरकारी सदनिकांचा लाभ संबंधित लाभधारक न घेता भाडेकरी घेत असल्याची बाब समोर आली आहे.

संजय शहाणे : इंदिरानगरयेथील पांडवनगरी परिसरात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष योजनेतून बांधण्यात आलेल्या सरकारी सदनिकांचा लाभ संबंधित लाभधारक न घेता भाडेकरी घेत असल्याची बाब समोर आली आहे. या परिसरात सरकारी वसाहतीमध्ये भाडेकरारावर घरे मिळत असल्याने सरकारी वसाहत ही भाडेकरूंची वसाहत बनली आहे. शासनाच्या मूळ उद्देशाला यामुळे धक्का बसला असून, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पांडवनगरी परिसरात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष सवलतीत घरे बांधून दिली आहेत. परंतु बहुतेक कर्मचाऱ्यांनी आपली घरे ही भाडेतत्त्वावर इतरांना दिली आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांचा हा व्यवसायच बनला असून स्वत: आलिशान घरात राहून सरकारी घरे मात्र भाड्याने देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या प्रकारामुळे ज्या गरजू कामगारांना खऱ्याअर्थाने घरांची गरज आहे त्यांना मात्र घरे मिळण्यास अडचणी येत आहेत. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी जीआयएस सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष सवलतीतून या ठिकाणी गृहनिर्माण संस्था उभ्या राहिल्या आहेत. या योजनेंतर्गत जे सरकारी कर्मचारी घरापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी सदर योजना राबविण्यात येते. त्यानुसार पांडवनगरीमध्ये सुमारे दोन हजार सदनिका बांधण्यात आल्या आहेत. मात्र सुमारे ७५ टक्के सदनिकांमध्ये आजच्या स्थितीत भाडेकरी मुक्कामास आहेत. ज्यांच्या मालकीची ही घरे आहेत ते सरकारी कर्मचारी या ठिकाणी न राहाता घरे भाड्याने देण्याचा व्यवसाय करू लागले आहेत.पोलीस ठाणेही अनभिज्ञ  प्रत्येक घरमालकाने आपल्या घरातील भाडेकरूची माहिती पोलीस ठाण्यात नोंद करावी, असे शासनाचे आदेश आहेत. असे असतानाही पांडवनगरीतील भाडेकरूंबाबत मालकांनी कोणतीही माहिती पोलीस ठाण्याला दिलेली नाही. त्यामुळे पोलीस आणि संबंधित खात्याचीही लाभधारक कर्मचाऱ्यांकडून फसवणूक केली जात असल्याचाच हा प्रकार मानला जात आहे. विशेष म्हणजे ही घरे देताना सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या घरात कोण राहातो याची पुरेशी माहितीदेखील नसते. कारण एजंटच्या मार्फत सदनिकांमध्ये भाडेकरू दाखल होत आहेत. सर्वकाही व्यवहार हा केवळ एजंटच्या भरवशावरच सुरू असून, घरमालकाला दरमहा भाडे मिळावे एवढेच माहीत असते. त्यामुळे शासकीय मालमत्तेचा दुरुपयोग होत आहे, शिवाय धोकादेखील पत्करला जात आहे.  सदनिकाधारक काही कर्मचारी नाशिकमध्येच आहेत तर काही बदलीच्या ठिकाणी आहेत. त्यांच्या घरात सध्या भाडेकरी आहेत. अन्यत्र या कर्मचाऱ्यांची स्वतंत्र घरे आहेत, त्यामुळे ते या सरकारी वसाहतीमध्ये राहायला येण्यास तयार नाहीत.