शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 23:02 IST

सिन्नर : शहरातील देशमुखनगर परिसरातील अश्वीनाथबाबा चौकात वास्तव्यास असलेल्या महाविद्यालयीन तरुणाने राहत्या घरातील बेडरुमध्ये सिलींग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.

सिन्नर : शहरातील देशमुखनगर परिसरातील अश्वीनाथबाबा चौकात वास्तव्यास असलेल्या महाविद्यालयीन तरुणाने राहत्या घरातील बेडरुमध्ये सिलींग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.शुभम सुनील वहाणे (१९) असे या महाविद्यालयीन तरुणाचे नाव असून तो सिन्नर महाविद्यालयात पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. देशमुख नगरमधील आश्वीनाथबाबा चौकातील रो-हाऊसमध्ये शुभम हा आईसह राहत होता. आई माळेगाव येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात कामाला होती. काल सकाळी आई कामावर गेल्यानंतर शुभम घरी एकटाच होता. त्याने घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या बेडरुममधील पंख्याला साडीने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. शुभमच्या बेडरुममधील खिडकी उघडी असल्याने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याच्या शेजारील कुटूंबियांना शुभमने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. नगरसेवक पावसे यांनी लागलीच सिन्नर पोलीस ठाण्यात कळविले. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश परदेशी, हवालदार विनोद टिळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन फॅनला लटकलेला शुभमचा मृतदेह खाली उतरवुन घेत शवविच्छेदनासाठी नगरपालिका दवाखान्यात पाठविला. दरम्यान, शुभमच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ न शकल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेSuicideआत्महत्या