शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

भुसे यांच्याकडून कॉलेजची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:27 IST

मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयाच्या इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या नर्सिंग कॉलेजची पाहणी व प्रशिक्षणार्थींशी चर्चा करून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच येत्या आठ दिवसात नवीन इमारतीत प्रशिक्षण व एका महिन्याच्या आत निवासाची सोय पूर्ण केली जाणार असल्याची माहिती भुसे यांनी पत्रकारांना दिली.

मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयाच्या इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या नर्सिंग कॉलेजची पाहणी व प्रशिक्षणार्थींशी चर्चा करून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच येत्या आठ दिवसात नवीन इमारतीत प्रशिक्षण व एका महिन्याच्या आत निवासाची सोय पूर्ण केली जाणार असल्याची माहिती भुसे यांनी पत्रकारांना दिली.महाराष्टÑ परिचर्या परिषदेच्या मंजुरीनंतर गेल्या २८ आॅगस्टपासून नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात आले आहे. कॉलेज व वसतिगृहाच्या कामास चार कोटी २७ लाख रुपयांची आवश्यकता आहे. दोन्ही इमारतींचे काम अंतिम टप्प्यात आहे. ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र भारतीय परिचर्या परिषद व स्वास्थ्य परिवार कल्याण मंत्रालय नवी दिल्ली यांनी एएनएम (मिडवाईफ नर्स) जीएनएम (अधिपरिचर्या) या अभ्यासक्रमासाठी ४० विद्यार्थिनींना प्रवेश देण्याचे निश्चित केले होते. सदरचे कॉलेज २८ आॅगस्टपासून येथील सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात आले आहे.प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींच्या अडीअडचणी व इमारतीच्या कामाची पाहणी करण्यासाठी बुधवारी ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी सामान्य रुग्णालयात अचानक भेट दिली. यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधत अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच इमारतीच्या उर्वरित कामासाठी दुसºया टप्प्याच्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. नर्सिंग कॉलेजला मान्यता लवकर मिळावी यासाठी तातडीने महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रशिक्षण घेणाºया विद्यार्थिनींना योग्य सुविधा व त्यांच्या सुरक्षततेबाबत योग्य काळजी घेतली जात आहे. या संबंधीच्या सूचना ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे व नर्सिंग कॉलेजच्या कर्मचाºयांना दिल्या आहेत.भुसे यांच्या समवेत सुनिल देवरे, रामा मिस्तरी, राजेश गंगावणे राजेश अलीझाड, विनोद वाघ आदिंसह पदाधिकारी, डॉ. त्रिभुवन उपस्थित होते.नर्सिंग कॉलेजमध्ये सध्या २८ विद्यार्थिनी व २ विद्यार्थी असे ३० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. एक प्राचार्य व चार शिक्षक कार्यरत आहेत. प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींच्या अडीअडचणी व इमारतीच्या कामांची पाहणी करण्यासाठी बुधवारी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सामान्य रुग्णालयात अचानक भेट दिली. यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधत अडीअडचणी जाणून घेतल्या.