शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारीच आरोपीच्या पिंजऱ्यात

By admin | Updated: July 22, 2016 00:55 IST

प्रांत अधिकाऱ्याचा निष्कर्ष : भरतीत फेरमुलाखतीची शिफारस

नाशिक : पोलीसपाटील भरतीतील गैरप्रकारावर हतबल झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनीच सिन्नर व निफाड तालुक्यातील तक्रारदारांच्या फेरतोंडी मुलाखती घ्याव्यात, अशी शिफारस करतानाच, निफाड प्रांत अधिकाऱ्याने तोंडी मुलाखतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेला गुणदानाचा तक्ता, नमुना अथवा लेखी आदेश मुलाखत समितीस मिळालेलाच नाही, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. निफाड व सिन्नर तालुक्यातील पोलीसपाटील भरतीबाबत झालेल्या तक्रारीच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यास अन्याय झालेल्या अकरा उमेदवारांच्या फेरमुलाखती घेण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात प्रांत अधिकाऱ्याने फेर मुलाखती घेण्याऐवजी ज्यांच्या तक्रारी आहेत, त्यांच्या कागदपत्रांची फेर तपासणी केली व त्यापैकी सहा गावांतील उमेदवारांना पुन्हा अपात्र ठरवित, आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. या अहवालात निफाड प्रांत अधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या गुणदानाची पद्धत विचारात घेतली नसल्याचे खुलेपणाने कबूल केले असून, उमेदवारांच्या तोंडी मुलाखतींसाठी अपेक्षित असलेल्या गुणांबाबत कुठल्याही स्वरूपाचे लेखी आदेश अथवा तक्ता, नमुना मुलाखत समितीस प्राप्त झाले नसल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात या परीक्षेसाठी एकच पॅटर्न असावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रांत अधिकाऱ्यांना गुणदानाचा तक्ता ठरवून दिल्याचा जो काही दावा यापूर्वी करण्यात आला. (प्रतिनिधी)