शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कळवणला पहिल्यांदाच होणार मूर्तींचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:08 IST

कळवण : गणेशोत्सवात घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये बसविण्यात आलेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी अनंत चतुर्दशीला नदीपात्र व धरण परिसरात गर्दी होत असते, मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विसर्जनसाठी नदीवर होणारी गर्दी टाळली जावी, यासाठी नगरपंचायतीने शहरात पाच विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला असून, पोलीस प्रशासनाकडूनही मूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यंदा प्रथमच कळवण शहरात मूर्तिदान उपक्रम राबवला जाणार आहे.

ठळक मुद्दे गणेशोत्सव : मूर्तिदान करण्याचे नगरपंचायत, पोलीस प्रशासनाने आवाहन

कळवण : गणेशोत्सवात घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये बसविण्यात आलेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी अनंत चतुर्दशीला नदीपात्र व धरण परिसरात गर्दी होत असते, मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विसर्जनसाठी नदीवर होणारी गर्दी टाळली जावी, यासाठी नगरपंचायतीने शहरात पाच विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला असून, पोलीस प्रशासनाकडूनही मूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यंदा प्रथमच कळवण शहरात मूर्तिदान उपक्रम राबवला जाणार आहे.पाच महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामुळे मार्च महिन्यापासून सर्वच सण, उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहेत. यंदा गणेशोत्सवही अत्यंत साधेपणाने व गर्दी टाळून साजरा करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. शहरात सार्वजनिक मंडळांनी मिरवणूक न काढता गणेश स्थापना करून प्रशासनाच्या नियमांचे पालन केले आहे. विसर्जन मिरवणुकीवरही बंदी असल्याने मिरवणुका काढता येणार नाही.विसर्जनावेळी नदी, धरण परिसरात गणेशभक्तांनी गर्दी करू नये यासाठी कळवण नगरपंचायतीने शहरात पाच ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या संकलन केंद्रांवर मूर्तिदान करण्याचे आवाहन पोलीस प्रशासन आणि नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.नगरपंचायतीने स्थापन केलेल्या संकलन केंद्रांवर गणेशभक्तांना आरती करता येणार नसून घरीच अथवा मंडळात आरती व पूजा करून संकलन केंद्रात मूर्तिदान करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. निर्माल्यही नदीत विसर्जित करता येणार नसून, मूर्ती संकलन केंद्रांवर हे जमा करून जलप्रदूषण टाळावे, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.कळवण शहरात विठ्ठल मंदिर (गांधी चौक), पंपिंग स्टेशन (गिरणा नदी), मार्केट कमिटी (नाकोडा रोड), कळवण मर्चंट बँकेसमोर व संभाजीनगर (गावठाण) या ठिकाणी मूर्ती संकलित केल्या जाणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरात मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. मूर्तिदान करून प्रशासनाला सहकार्य करावे.- कौतिक पगार, अध्यक्ष, करोना प्रतिबंध कमिटी

सर्व घरगुती गणपती व सार्वजनिक मंडळांनी विसर्जन स्थळीगर्दी टाळण्यासाठी मूर्तिदान संकल्पनेला प्रतिसाद द्यावा. सुरक्षित आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून मूर्ती संकलन केंद्रावर मूर्तिदान कराव्यात.- प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक

कळवण शहरात पाच ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे सुरू केली जाणार आहेत. गणेशभक्तांनी घरीच आरती करून संकलन केंद्रावर मूर्तिदान कराव्यात. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहकार्य करावे.- डॉ. सचिन पटेल, मुख्य अधिकारी, नगरपंचायत

 

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी