न्यायडोंगरी : गावातील मुख्य रस्त्यालगतच्या गटारीवरील ढापे तुटल्याने बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने येथून चालणाऱ्यास मोठी कसरत करावी लागत आहे. सदर सांडपाणी चारी अक्षरश: जीवघेणी बनली आहे. ती नव्याने बांधण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. गावाच्या मुख्य रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. येथील श्रीराम मंदिर प्रांगणालगतचा परिसराचे कॉँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र गटार मधोमध असून, त्यावरील ढापे तुटून गेले आहेत. आजही या ढाप्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे यात वाहनही फसत आहेत. शिवाय खड्डे चुकवताना छोटे-मोठे अपघात होत आहे. याबाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित या गटारीवर नव्याने सीमेंट ढापे टाकण्यात यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
ढापे तुटल्याने अपघाताला आमंत्रण
By admin | Updated: October 6, 2014 00:15 IST