शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वाढता वाढे नाशकात थंडीचा कडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:12 IST

गेल्या शुक्रवारपासून शहराच्या वातावरणात बदल होण्यास सुरुवात होऊ लागली. शनिवारी सकाळी अचानकपणे किमान तापमानाचा पारा घसरला आणि नाशिककरांना कडाक्याची ...

गेल्या शुक्रवारपासून शहराच्या वातावरणात बदल होण्यास सुरुवात होऊ लागली. शनिवारी सकाळी अचानकपणे किमान तापमानाचा पारा घसरला आणि नाशिककरांना कडाक्याची थंडी पुन्हा अनुभवयास येऊ लागली. दिवाळीपासून थंडी वातावरणातून गायब झाली होती. यामुळे नाशिककरांनी आपले उबदार कपडे पुन्हा घडी करून ठेवले होते; मात्र मागील चार दिवसांपासून थंडीची तीव्रता दररोज वाढू लागल्याने नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांंचा वापर करताना दिसून येत आहे.

पहाटे तसेच संध्याकाळी नागरिकांना थंडीची कमालीची तीव्रता जाणवली. रविवारप्रमाणे सोमवारीसुद्धा सकाळी १० वाजेपर्यंत वातावरणात गारठा जाणवत होता.

विदर्भापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यभरात बोचऱ्या थंडीने जोरदार पुनरागमन केले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमान परभणी (१०.२) येथे नोंदविले गेले. त्यानंतर सर्वाधिक थंडीचा कडाका असलेले दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे नाशिक. नाशकात थंडीचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे.

गोदाकाठासह शहरातील झोपडपट्ट्यांच्या भागात तसेच गावठाण भागासह शहरालगतच्या खेड्यांमध्ये सायंकाळनंतर शेकोट्याही पेटू लागल्या आहेत. रविवारी राज्यात सर्वाधिक कमी नीचांकी तापमानाची नोंद पुणे येथे १०.७ अंश इतकी करण्यात आली. महाबळेश्वरच्या तुलनेत अन्य शहरे सर्वाधिक थंडीने गारठली आहेत.

=

--इन्फो--

फुलले शहरातील जॉगिंग ट्रॅक

थंडीची तीव्रता पुढील आठवडाभर शहरात कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे. पहाटेच्या सुमारास थंडीचा कडाका अधिक जाणवत असला तरी सकाळी व्यायामप्रेमींच्या उत्साहावर त्याचा कुठलाही परिणाम झालेला सध्या दिसून येत नाही. हौशी व्यायामप्रेमींची संख्या अधिक वाढू लागली आहे. शहरातील मध्यवर्ती भागासह गंगापूररोड, कॉलेजरोड, इंदिरानगर, गोविंदनगर, कृषिनगर, डीजीपीनगर, रविशंकर मार्ग, अशोकामार्ग, उपनगर आदी भागांमधील जॉगिंग ट्रॅकवर सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारणाऱ्यांच्याही संख्येत वाढ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे-

---इन्फो----

...आला आरोग्यवर्धक हिवाळा

हिवाळा ऋतू आरोग्यवर्धक मानला जात असल्यामुळे बहुतांश तरुण व्यायामप्रेमी बोचऱ्या थंडीकडे दुर्लक्ष करीत ‘वॉर्मअप’द्वारे ऊर्जा निर्माण करत व्यायामावर भर देत आहे. ग्रीन जीमचा वापरही वाढला असून, शरीरासाठी गुणकारी असलेल्या विविध औषधी रसांनाही मागणी मिळत आहे. व्यायाम करताना जॉगिंगट्रॅकवर मिळणाऱ्या विविध पालेभाज्या, फळभाज्यांसह आवळासारख्या औषधी गुणधर्म असलेल्या फळांच्या रसाची विक्री हंगामी विक्रेते करताना दिसत आहे.

---