शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलाने सर्दी-खोकल्याचा वाढला त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:09 IST

बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला असून, सर्दी-खोकल्याच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. थंडी तर कधी अचानकपणे वाढणारे ऊन यामुळे वातावरण असंतुलित झाल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असणाºया नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

नाशिक : बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला असून, सर्दी-खोकल्याच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. थंडी तर कधी अचानकपणे वाढणारे ऊन यामुळे वातावरण असंतुलित झाल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असणाºया नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.  शहराच्या कमाल तपमानात वाढ होण्यास सुरुवात झाल्याने उन्हाचा चटका जाणवत होता. सकाळी ८ वाजेपासून कडक ऊन पडत होते. सलग दहा ते बारा दिवस कमाल तपमान वाढल्यामुळे थंडी गायब होऊन उन्हाळा सुरू झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला होता; मात्र पुन्हा दोन दिवसांपूर्वी कमाल तपमानाचा पारा घसरून पारा दहा अंशांवर आल्याने थंडी जाणवू लागली होती. दोन दिवस किमान तपमान घसरलेले असताना मंगळवारपासून पुन्हा पारा वर सरकू लागला आहे. मंगळवारी (दि.२३) किमान तपमान १२.६ अंश, तर कमाल तपमान २८ अंश इतके नोंदविले गेले.  एकूणच थंडी-ऊन कमी जास्त होऊ लागल्याने वातावरणावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. वातावरण बदलाचा हा फटका नागरिकांना बसू लागला असून, काही नागरिकांना सर्दी-पडसे व खोकल्याचा त्रास होऊ लागला आहे. खासगी दवाखान्यांमध्ये या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. हवामान बदलामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी.  दिवसा उनापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी, हॅट किंवा सनग्लास वापरावा तसेच महिलांनी सनकोट स्कार्फचा वापर करावा तसेच संध्याकाळीदेखील ऊबदार कपडे वापरावे जेणेकरून उन्हाचा चटका व थंड वाºयापासून बचाव होऊ शकेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. खोकला किंवा सर्दीचा त्रास होत असल्यास पाणी उकळून पिण्यास प्राधान्य द्यावे. दुचाकीवर प्रवास करताना नाकातोंडाला रुमाल बांधण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.तपमानात सातत्याने चढ-उतार शहराच्या किमान तपमानात सातत्याने चढ-उतार होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. बुधवारी (दि.२४) किमान तपमान ८.८इतके होते तर गुरूवारी (दि.२५) तपमान कमालीचे घसरले आणि ७.२ इतक्या नीचांकी तपमानाची नोंद झाली. या हंगामातील हे सवार्धिक कमी नीचांकी तपमान ठरले. शुक्रवारी (दि.२६) तपमानात काही अंशी वाढ होऊन ८ अंश इतके तपमान नोंदविले गेले. शनिवारी (दि.२७) ८.८ इतके किमान तपमान होते. एकूणच सातत्याने घसरणाºया किमान तपमानासोबत कमाल तपमानात मात्र या आठवड्यात सतत वाढ होत गेल्याने कमाल तपमानाचा पारा २८ अंशावरून पुरे ३०.६ अंशापर्यंत सरकला आहे. एकूणच नाशिककरांना सध्या कडाक्याच्या ऊन्हासोबत कडाक्याची थंडीही अनुभवयास येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही बदलत्या हवामानाचा परिणाम होत आहे.

टॅग्स :Temperatureतापमान