शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता : मतदारांच्या पार्ट्यांवर लक्ष ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:07 IST

जिल्ह्यत ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारांकरवी नामांकन भरले जात असताना या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता अधिकाधिक कडक करून राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जाहीर प्रचारावर निर्बंध लावतानाच, उमेदवारी दाखल करण्यासाठी फक्त तीनच कार्यकर्त्यांना मुभा देण्यात आली आहे.

नाशिक : जिल्ह्यत ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारांकरवी नामांकन भरले जात असताना या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता अधिकाधिक कडक करून राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जाहीर प्रचारावर निर्बंध लावतानाच, उमेदवारी दाखल करण्यासाठी फक्त तीनच कार्यकर्त्यांना मुभा देण्यात आली आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीचे नामांकन आॅनलाइन पद्धतीने भरण्याची सक्ती करण्यात आली असून, यंदा सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून घेण्यात येणार असल्याने त्यादृष्टीने गावातील भाऊबंदकी, राजकीय वैमनस्य या सर्व गोष्टींचा विचार करीत आयोगाने आचारसंहितेच्या माध्यमातून त्यावर निर्बंध आणले आहेत. ज्या जिल्ह्यातील एकूण गावांच्या ५० टक्के ग्रामपंचायतींच्या निवडणुका असतील त्या संपूर्ण जिल्ह्णात आचारसंहिता जारी करण्याचा तर ज्या तालुक्यातील ५० टक्के ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील त्या तालुक्यात संपूर्ण आचारसंहिता जारी करण्यात येणार असून, सध्या ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत त्या ग्रामपंचायतीला लागून असलेल्या गावांमध्येदेखील आचारसंहिता जारी राहणार आहे. ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या ठिकाणी आचारसंहिता जारी असेल, अन्यत्र विकासकामे करण्यास कोणतीही हरकत आयोगाने ठेवली नसली तरी, लगतच्या मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही कृत्य करण्यास मात्र मज्जाव करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यापासून ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाºयाच्या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात येणार असून, नामांकन भरण्यास येणाºया उमेदवारासोबत फक्त तीन व्यक्तींनाच निवडणूक अधिकाºयाच्या दालनात प्रवेश असणार आहे. गावाचे क्षेत्र तसेच लोकसंख्या मर्यादित असल्यामुळे ग्रामपंचायतीत उमेदवारी करणाºया उमेदवाराला प्रभागात फक्त एकच प्रचार कार्यालय उघडण्यास अनुमती असून, प्रचारासाठी वाहन व कार्यकर्त्यांची गरज नसल्याचे आयोगाने म्हटले आहे; मात्र उमेदवाराने मागणी केल्यास एक चारचाकी किंवा दोन दुचाकी वाहने प्रचारासाठी वापरता येतील त्याची रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे व एका उमेदवाराने वापरलेले वाहन दुसरा उमेदवार प्रचारासाठी वापरू शकणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.