शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता लागू : भूमिपूजन झालेली  कामे रोखण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 01:32 IST

लोकसभा निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर अनेक टोकाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यात जी कामे सुरू करण्याचे अंतिम कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत

नाशिक : लोकसभा निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर अनेक टोकाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यात जी कामे सुरू करण्याचे अंतिम कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत, परंतु कामे सुरू झालेली नाही अशी कामे तातडीने रोखण्यात येणार आहेत. त्यामुळे अलीकडेच कोट्यवधी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मोठा फटका बसणार आहे. नवीन कामांसाठी निविदा मागवण्यास पूर्णत: मनाई करण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू होण्याच्या आत अनेक लोकप्रतिनिधी म्हणजेच नगरसेवक आणि आमदारांनी कामाचा धडका लावला होता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कामांचा किमान शुभारंभ झाल्याचे दिसले तरी त्याचा लाभ होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सोमवारी (दि. ११) जिल्हाधिकाऱ्यांकडे आचारसंहिता अंमलबजावणीबाबत झालेल्या बैठकीत वेगळेच घडले. ज्या कामांना महापालिकेने यापूर्वी कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. ते करता येत होते. परंतु आचारसंहिता लागू होईपर्यंत त्या कामासाठी कुदळ मारली नसेल तर अशी कामे तातडीने रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कामांचे भूमिपूजन होऊन सुद्धा किमान मेअखेर म्हणजेच आचारसंहिता पूर्णत: रद्द होईपर्यंत करणे कठीण झाले आहेत.  आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेची कोट्यवधी रुपयांची कामे रखडली असून, यात स्मार्ट सिटीच्या चारशे कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे.झटपट अर्थसंकल्प व्यर्थमहापालिकेचा अर्थसंकल्प आचारसंहितेत अडकू नये यासाठी आयुक्तांनी २१ फेबु्रवारीस अर्थसंकल्प सादर केल्यानंतर स्थायी समितीने २८ फेब्रुवारीस तातडीने मंजूर केला आणि महासभेसाठी नगरसचिवांकडे पाठविला. महापौर रंजना भानसी यांनी तातडीने म्हणजेच ७ मार्च रोजी तो मंजूर केला. परंतु त्यासंदर्भातील ठराव लिहीपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने आता स्थायी समितीचाच ठराव अंतिम असणार आहे.रजिस्टरवर नमूद केले ‘क्लोज्ड’महापालिकेतील निविदाप्रक्रिया पुन्हा मागवल्या जाऊ नये तसेच निविदा उघडल्या गेल्या असतील किंवा अन्य काही कार्यवाही करायच्या असतील तर त्या करता येऊ नये यासाठी महापालिका आयुक्तांनी सर्व खातेप्रमुखांच्या अशा रजिस्टरवर क्लोज्ड, असे लिहिले आहे.पदाधिकाऱ्यांनी बोलवले तरी जाऊ नका...जिल्हाधिकाºयांकडे झालेल्या बैठकीत अधिकाºयांना राजकीय नेते किंवा लोकप्रतिनिधींनी बोलवले तरी जाऊ नका असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवारीच  (दि. ११) एका पदाधिकाºयाने अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ यांना बोलविल्यानंतर त्यांनी आचारसंहितेमुळे येऊ शकत नसल्याचे सांगून असमर्थता व्यक्त केली.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय