लासलगाव : मरळगोई बुद्रुक येथे निलवसंत मेडिकल फाउंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटर व जिल्हा क्रीडा कार्यालय, नाशिक युवा क्रीडा विकास संस्था, मरळगोई यांचे संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ८० रुग्णांची तपासणी केली. त्यातील १३ रुग्ण मोतीबिंदू असल्याने आढळून त्यांची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉ. विनोद चौधरी यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन सचिव मीनाश्री पवार यांनी केले. या प्रसंगी सरपंच लता जगताप, राजेंद्र पवार, सोसा. चेअरमन केदू जगताप, जनार्दन जगताप, संजय दरेकर, रामचंद्र जगताप, नारायण जगताप, रामभाऊ जगताप, सुरेश जगताप, प्रकाश पवार याप्रसंगी उपस्थित होते. केंद्रप्रमुख दामोधर बोरसे यांचा सेवापूर्ती सोहळा हरसूल : त्र्यंबकेश्वर पंचायत समितीमधील ज्येष्ठ केंद्रप्रमुख दामोदर बोरसे सेवानिवृत्त झाल्याने शिरसगाव येथील शासकीय आश्रमशाळेत सेवापूर्ती सोहळा पार पडला. पंचायत समिती सभापती सुनंदा भोये, गटशिक्षण अधिकारी के. बी. माळवाळ, विस्तार अधिकारी खंडू भोये, सरपंच सीताबाई महाले, भगवान महाले, पोलीसपाटील शंकर महाले, मुख्याध्यापक शरद वाणी, विस्तार अधिकारी राज अहेर, अर्जुन भोये, सविता आघाव, शिरसगाव, हरसूल, भागओहळ केंद्रातील सर्व मुख्याध्यापक तसेच शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोरसे यांनी ठेपणपाडा, दिंडोरी, बोरीपाडा, तोरंगण, दलपतपूर, आमलोन आदि ठिकाणी सेवा बजावली. यावेळी त्यांचा सभापती सुनंदा भोये व गटशिक्षण अधिकारी के.बी. मालवाळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भगवतगीता देऊन सत्कार करण्यात आला.
मरळगोई येथे मोतीबिंदू तपासणी शिबिर
By admin | Updated: July 31, 2014 00:56 IST