शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजपामध्ये मिलीभगत

By admin | Updated: February 19, 2017 23:40 IST

अशोक चव्हाण : न्यायडोंगरी, काजीसांगवीत सभा

न्यायडोंगरी : महाराष्ट्रात शिवसेना- भाजपामध्ये मिलीभगत असून, आपण दोघे भाऊ भाऊ दोघे मिळून वाटून खाऊ अशी त्यांची स्थिती आहे़ तेव्हा खरोखर सर्वसामान्याची चाड असेल तर सेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे देऊन सत्तेतून बाहेर पडावे नंतर नैतिकतेच्या गोष्टी कराव्या असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी न्यायडोंगरी येथील जाहिर सभेत केलेन्यायडोंगरी येथे कॉँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. चव्हाण पुढे म्हणाले, कुस्तीच्या आखाड्यात तेल लावून उतरतात यातील कोण जिंकणार व कोण पराभूत होईल याची उत्सुकता सर्वसामान्य जनतेला लागलेली असते, परंतु दोन्ही मल्लांनी अगोदरच ठरविलेले असते. आज तू पराभूत हो मी जिंकेल नंतर आपसात मिळालेला इनाम वाटून घेऊ अशा प्रकारचा कारभार युती शासनाचा सुरू असल्याचा आरोप केला. या सभेच्या व्यसपीठावर आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार अनिल अहेर, प्रदेश निरीक्षक प्रदीप पवार यासह तालुक्यातील, गट-गणातील उमेदवार उपस्थित होते़  काजीसांगवी येथे सभाचांदवड : भाजपा- शिवसेना सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत असून, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी देशोधडीला लावला जात आहे.  भाजपा-सेनेच्या सरकारमध्ये हिंमत असेल त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन त्यांचा सातबारा कोरा करुन दाखवावा, असे आवाहन राष्ट्रीय कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. ते रविवारी चांदवड तालुक्यातील तळेगावरोही गटातील जिल्हा परिषद आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काजीसांगवी येथील जाहीर सभेत बोलत होते. पुढे ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तेथील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देत आहे. मग महाराष्ट्रातील भाजपा-सेना सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी का देत नाही असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. फडवणीस सरकारला धडा शिकविण्यासाठी राष्ट्रीय कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन केले.  यावेळी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी भाजपा उमेदवारांचा खरपूस समाचार घेतला. प्रचार सभेत जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजी आमदार उत्तम बाबा भालेराव, खंडेराव अहेर, डॉ. सयाजीराव गायकवाड, शहाजी भोकनळ, मीनाताई कोतवाल, दत्तात्रय वाकचौरे, तालुकाध्यक्ष संजय दगुजी जाधव आदि उपस्थित होते.