शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरण : कांदा, डाळींब, गहू, हरबऱ्यावर औषध फवारणी

By admin | Updated: January 24, 2015 23:08 IST

पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

ब्राह्मणपाडे : मोसम खोऱ्यात गेल्या काही महिन्यांपासून सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे कांदा पिकावर करपा व मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्यामुळे शेतकरी पीक वाचविण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करताना दिसून येत आहे.मोसम खोऱ्यासह परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. कांदा पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते; मात्र चालू वर्षी निसर्ग जणू काय शेतकऱ्यांची कसोटी पाहत आहे. वटार : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या वटार, चौंधाणे येथे सकाळपासून वातावरणात अचानक बदल होऊन दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे कांदा, डाळींब, गहू, हरबरा या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिसरात यंदा बराच काळ थंडीचा जोर असल्यामुळे रब्बी पिके जोमात होती; पण गेल्या काही दिवसांपासून परिसरातील वातावरणात बदल झाला. वातावरणात धड थंडी नाही व धड उन्हाळा नाही, असे ढगाळ व रोगट स्वरूपाचे होते. परिणामी कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात मावा, करपा, पिवळेपणा येणे अशा प्रकारच्या रोगांनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केले. त्यामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान होऊन उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तसेच डाळींब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चिन्हे आहेत. सततच्या वातावरणातील बदलामुळे डाळींब उत्पादक शेतकरी महागडी औषधे फवारणी करून ऐन फळ जोर बसण्याच्या वेळेत निसर्ग लहरीपणा करतो. तोंडात येणारा घास हिसकावला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. या ढगाळ वातावरणामुळे संकटाचेच ढग घुमत आहेत. (वार्ताहर)