शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केद्राई धरणातून सोडलेले आवर्तन बंद

By admin | Updated: January 10, 2016 22:50 IST

शेतकरी संतप्त : शासनाचा केला निषेध

वडाळीभोई : खडकओझर येथील केद्राई धरणात अत्यंत कमी पाणी साठा शिल्लक असताना या धरणातून देवरगाव - खडकमाळेगाव या कालव्याला ९ दिवसांपासून पाणी सुरू होते. कालव्याला प्रचंड गळती असल्यामुळे वाहणारे कालव्यातील पाणी नदीत जाऊन नदीवरील  छोटे मोठे बंधारे भरून ते पाणी खडकमाळेगावपर्यंत पोहोचले तरी संबंधित विभागाने या वाया जाणाऱ्या पाण्याकडे लक्ष दिले  नाही, असा आरोप करीत संतप्त शेतकऱ्यांनी पाणी बंद केले. परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी थेट पाणी बंदचा पवित्रा घेऊन धरणावर जाऊन पाण्याचा विसर्ग बंद केला.यावेळी वडाळीभोईचे सरपंच निवृत्ती घाटे, खडकओझरचे सरपंच विजय पगार, सभापती दत्तू पगार, तुकाराम पगार, माधव वाघ, तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते. केद्राई धरणातून देवरगावपर्यंत पाणी सोडण्यास हरकत नव्हती, परंतु सोडलेले पाणी निफाड तालुक्यातील माळेगावपर्यंत जाऊन पोहचले त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले याला जबाबदार कोण असा प्रश्न संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला. तर केद्राई धरणाच्या पाण्याने वडाळीभोई, खडक ओझर, जोपुळ, भाटगाव आदि गावाची धरणाच्या पाण्याने तहान भागवली जाते. या परिसरात दुष्काळी परिस्थिती असतानाही एवढे पाणी वाया गेल्यामुळे प्रशासनाने यावर नियंत्रण ठेऊन पिण्यासाठी पाणी राखून ठेवणे गरजेचे असल्याचे मत वडाळीभोईचे सरपंच निवृत्ती घाटे व परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले.(वार्ताहर)