---------------------------------------------------------------------------------------------------
मनपाकडून खासगी कत्तलखान्यांना नोटीसा
मालेगाव : शहरातील दरेगाव शिवारात सुरू असलेल्या खासगी कत्तल खान्यांकडून अटी, शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने परवाने रद्द करण्याबाबत अंतिम नोटीस बजावली आहे. मालेगाव आवामी पार्टीचे राज्य अध्यक्ष रिजवान अहमद मोहंमद अकबर बॅटरीवाला यांनी मनपा आयुक्त दीपक कासार यांच्याकडे दरेगाव शिवारातील तिन्ही खासगी कत्तल खान्यांकडून नियमांचे उल्लंघन केल्याबाबत लेखी तक्रार केली होती. या तक्रारींची मनपा आयुक्त कासार यांनी गंभीर दखल घेतली आहे. शेख रिजवान शेख उस्मान कुरैशी, शेख इम्रान शेख उस्मान, जावीद शाहीनअली वाहीद कुरैशी, विजयकुमार पिल्लई या खासगी कत्तलखाना मालकांना कत्तलखान्याचा परवाना रद्द का करू नये, अशी अंतिम नोटीस बजावून तीन दिवसांच्या आत कागदपत्रे व खुलासा सादर करण्याचे नोटिसीत म्हटले आहे.