शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

राज्यातील १२२ शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण बंद

By admin | Updated: December 16, 2015 00:24 IST

दीड हजार विद्यार्थी मुकणार : सहायक अधिव्याख्याता होणार हद्दपार

नाशिक : पूर्व माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविल्या जाणाऱ्या शाळांपैकी ज्या शाळांमध्ये इयत्ता नववीच्या तुकडीची पटसंख्या साठ आहे, अशा शाळांना एकही शिक्षक कर्मचाऱ्याची नियुक्ती करता येणार नाही. तसेच नवीन शासननिर्णयानुसार नववीच्या चार तुकड्यांपर्यंत सहायक अधिव्याख्याता हे पदही कमी करण्यात आले आहे; मात्र राज्यात नववीच्या चार तुकड्यांपेक्षा जास्त तुकड्या असलेली एकही अशासकीय अनुदानित शाळा नसून अधिव्याख्याता हद्दपार होणार असून, सुमारे १२२ शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पूर्व व्यावसायिक तांत्रिक अभ्यासक्रमांचा तासिकेचा कालावधी आठवड्यातील एकूण तासिका, शिक्षकांचा कार्यभार व प्रात्यक्षिकांची बॅच नव्याने निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार अभ्यासक्रमास दोन तुकड्या अर्थात किमान १२० विद्यार्थ्यांची अट टाकण्यात आली आहे. तसेच प्रात्यक्षिकांसाठी यापूर्वीच्या वीसऐवजी वाढ करून तीस विद्यार्थ्यांची बॅच निश्चित करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील १२२ शाळांमध्ये पूर्व व्यावसायिक तांत्रिक शिक्षणाचा अभ्यासक्रम धोक्यात आला आहे. कारण राज्यात नववीच्या चार तुकड्यांपेक्षा जास्त तुकड्या असलेली एकही अशासकीय अनुदानित शाळा नाही. व्यावसायिक तंत्रशिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये सहायक अधिव्याख्याता या पदाची शैक्षणिक पात्रता अभियांत्रिकी पदविका अशी आहे. तसेच शाळेतील काम करणाऱ्या शिक्षकांना हे पद समकक्ष असते. केंद्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाने नवीन शासननिर्णय जाहीर करत नवीन अभ्यासक्रम कोअर विषय अंतर्गत लागू केला आहे. या कायद्यातील त्रुटींबाबत न्यायालयात दाद मागण्यात आली आहे; मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नसतानाही गेल्या महिन्यात नवीन आकृतिबंध लागू करण्यात आला. या आकृतिबंधाला स्थगिती देण्याची मागणी राज्य अशासकीय तांत्रिक माध्यमिक शिक्षण कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.