शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याची आॅनलाइन ट्रीटमेंट बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 01:52 IST

नाशिक : नीरीच्या वतीने सोमेश्वरजवळ नाल्यातील प्रदूषित पाण्याचे नैसर्गिक झाडांच्या माध्यमातून शुद्धीकरण करण्यासाठी साकारण्यात आलेला प्रकल्प बंद पडला असून, औद्योगिक क्षेत्रातील हजारो लिटर पाणी गोदापात्रात सहज मिसळले जात आहे.

ठळक मुद्देगोदावरी प्रदूषण : सोमेश्वरजवळील प्रयोगाला घरघर

नाशिक : नीरीच्या वतीने सोमेश्वरजवळ नाल्यातील प्रदूषित पाण्याचे नैसर्गिक झाडांच्या माध्यमातून शुद्धीकरण करण्यासाठी साकारण्यात आलेला प्रकल्प बंद पडला असून, औद्योगिक क्षेत्रातील हजारो लिटर पाणी गोदापात्रात सहज मिसळले जात आहे.गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केल्यानंतर नीरी या संस्थेचे मार्गदर्शन घेतले. त्याचवेळी नीरीने महापालिकेला हा सल्ला दिला होता. परंतु हा प्रस्ताव नंतर रेंगाळला होता. कालांतराने गोदावरी प्रदूषणासाठी पर्यावरणप्रेमी सरसावल्यानंतर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नदी शुद्धीकरणासाठी हा प्रकल्प साकारण्याचे ठरले होते. त्यानुसार सोमेश्वरजवळील नाल्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा प्रकल्प नीरीने स्वखचाने तयार केला असून, त्यानंतर महापालिकेकडे देखभाल-दुरुस्तीसाठी दिला आहे.नीरी आणि आयआयटी पवई यांनी संयुक्तरीत्या नैसर्गिक झाडांपासून नाल्यातील प्रदूषणकारी घटक शोषून त्यातल्या त्यात चांगले पाणी प्रवाही करण्यासाठी फायटोईड टेक्नॉलॉजीचा हा प्रकल्प शोधून काढला. ज्याप्रमाणे नदीतील काही प्रमाणात प्रदूषित पाणी नैसर्गिक पद्धतीतील नदीतील काही वनस्पती स्वच्छ ठेवतात, त्याच धर्तीवर या प्रकल्पात शुद्धीकरण होते. दगड आणि खड्यांच्या माध्यमातून एक चौथरा तयार केल्यानंतर त्यात कर्दळी संवर्गातील झाडे लावली जातात आणि त्यांच्या मुळातून नाल्याचे पाणी प्रवाही होईल अशी व्यवस्था केली जाते. त्यामुळे आपोआप पाण्यातील काही प्रदूषणकारी घटक शोषले जातात.कुंभमेळ्यापूर्वी हा पथदर्शी प्रकल्प साकारून महापालिकेच्या ताब्यात दिल्यानंतर त्याची देखभाल करणे महापालिकेचे काम असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सध्या या प्रकल्पाची दुरवस्था झाली असून, फेसाळ पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. औद्योगिक वसाहतीतील हे रसायनयुक्त पाणी असून, ते थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने गोदावरी अधिक प्रदूषित होण्यास मदत होते आहे. दुरुस्ती आश्वासनाकडे दुर्लक्षकाही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी सदस्य तसेच विविध शासकीय अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यावेळी या प्रकल्पाची अवस्था चांगली नव्हतीच. मनपाच्या अधिकाºयांनी याबाबत दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे.