माठात दगड टाकून हुशारीने त्यातले पाणी वर आणणाऱ्या इसापनीतीतील तहानलेल्या कावळ्याची गोष्ट सर्वश्रुत आहे. पंचवटीतील मेरी भागातही असा एक कावळा आढळून आला. मेरीच्या जंगलात मोरांना पाणी पिण्यासाठी नळा खाली भांडी ठेवण्यात आली आहेत. त्यातले उष्टे पाणी पिणे टाळून हे काकमहाशय नळावर चढले, बरीच खटपट केल्यानंतर या नळातून थेंब-थेंबभर पाणी पाडण्यात ते यशस्वी झाले. या पाण्याने त्यांनी आपली तहान भागवली अन् नंतर खाली साचलेल्या पाण्यात मस्त अंघोळही केली... कावळ्याची ही हुशारी टिपली आहे नीलेश तांबे यांनी...
चतुर कावळा
By admin | Updated: May 15, 2015 01:35 IST